AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन यांनी शब्द पाळला, भले भले देश रांगेत उभे असताना रशियाचा मित्र भारतासाठी सर्वात मोठा निर्णय, मोठ्या संकटातून सोडवलं

इराण, इस्त्रायल आणि अमेरिेकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतावरील मोठं संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

पुतिन यांनी शब्द पाळला, भले भले देश रांगेत उभे असताना रशियाचा मित्र भारतासाठी सर्वात मोठा निर्णय, मोठ्या संकटातून सोडवलं
Vladimir PutinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 5:58 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अनेक जहाजं हे तिथेच अडकून पडल्यानं अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जणावत आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भारतासाठी काही दिलासादायक घटना घडताना दिसत आहेत, त्यामुळे भारतामध्ये आता लवकरच इंधन टंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. इराणने आपल्या काही मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू केला आहे, त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गाने भारतात कच्चं तेल आणि नॅचरल गॅस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे आता रशिया देखील भारताच्या मदतीला धावून आला आहे.

रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना रशियानं भारताला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. तेव्हा भारतानं मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली. मात्र अमेरिकेसोबत करार झाल्यानंतर भारतानं रशियाकडून सुरू असलेली तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली होती. दम्यान त्यानंतर इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं. इराणने स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद केला, या पार्श्वभूमीवर भारतानं पुन्हा एकदा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. मात्र यावेळी रशियाकडून भारताला कोणत्याही प्रकारची सूट कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये देण्यात आलेली नाही, उलट दर वाढवण्यात आले आहेत. मात्र जरी असं असलं तरी या युद्धामुळे अनेक देश रशियाकडून तेलाची खरेदी करण्यासाठी तुटून पडलेले असताना, रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी भारतालाच प्राथमिकता दिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कधीही कमी पडू देणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता रशियानं आपला शब्द खरा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये भारताला प्राथमिकता देण्यात येत आहे. एवढंच नाही तर आता भारतानं हे इंधन संकट दूर करण्यासाठी आता आर्जेंटीना आणि अमेरिकेकडून देखील कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत