Maval: मुंबई-पुणे महामार्गावरील दीडशे फूट खोल दरीत पडला तरुण, मग…

पांडवकालीन घोरावडेश्वर डोंगर माथ्याच्या दीडशे फूट खोल दरीत पडला तरुण, शिवदुर्ग बचाव पथकाचे तीन तास अथक प्रयत्न

Maval: मुंबई-पुणे महामार्गावरील दीडशे फूट खोल दरीत पडला तरुण, मग...
dabhade police
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप | Updated on: Jan 11, 2023 | 8:21 AM

मावळ – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Mumbai-pune highway) तळेगांव (talegaon) जवळील पांडवकालीन घोरावडेश्वर डोंगर माथ्याच्या दीडशे फूट खोल दरीत पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली आहे. घटनास्थळी जाऊन शिवदुर्ग बचाव पथक, मावळ वन्यजीव रक्षक बचाव टीम आणि तळेगांव दाभाडे पोलीस (dabhade police) जवानांनी सदरचा मृतदेह दरीतून बाहेर मोठी कसरत करुन बाहेर काढला.

150 फुटांहून अधिक खोल हा मृतदेह होता

लक्ष्मण जटप्पा पुजारी,असं या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. घोरावडेश्वर येथील दरीत तरुण पडला असल्याची माहिती समजल्यानंतर तळेगांव पोलिसांनी मावळ वन्यजीव बचाव टीमचे निलेश गराडे तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकातील सुनील गायकवाड यांच्या टीमला कळवले.

टीमने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने सदरचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. संपुर्ण चौकशी झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow Us