AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, 24 वर्षांच्या तरूणीविरोधात बलात्कार, ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल

दक्षिण मुंबईतून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका 24 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार आणि 'पोक्सो'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, 24 वर्षांच्या तरूणीविरोधात बलात्कार, 'पोक्सो'चा गुन्हा दाखल
| Updated on: Feb 03, 2025 | 10:57 AM
Share

दक्षिण मुंबईतून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका 24 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली असून सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ही अल्पवयीन मुलगी ही 17 वर्षांची असून ती सध्या 12 वीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पूर्व उपनगरात राहते तर तिचे नातेवाईक भेंडीबाजार परिसरात राहतात, तर आरोपी तरुणीदेखील त्याच परिसरात राहते. पीडित मुलगी ही नातेवाईकांकडे येऊन-जाऊन असल्याने तिची त्या तरुणीसोबत ओळख होती. त्याच दरम्यान, दोघींमध्ये बोलणे वाढले, मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झाले. मात्र हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तिला गावी पाठवलं. काही दिवस गावी राहिल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी पुन्हा मुंबईत परतली व पालकांसोबत राहू लागली.

याचदरम्यान डिसेंबर महिन्यात 4 वर्षांच्या तरूणीने त्या मुलीशी संपर्क साधला आणि तिला भेटण्यास बोलावलं. दोघींनी सिनेमा पाहिला आणि मग पळून जायचे ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघी 6 जानेवारीला पळून गेल्या. बराच उशीर होऊनही मुलगी घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध करून अखेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता त्या दोघी विरारमधील एका रिसॉर्टमध्ये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथे जाऊन दोघींना ताब्यात घेऊन मुंबईत आणले. दोघींमध्ये जे घडले ते समोर आल्यानंतर 24 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. दोन दिवस त्या हॉटेलमध्ये थांबल्या, तर तीन दिवस एका भाडय़ाचे घर घेऊन राहिल्या होत्या अशी माहिती देखील समोर आली आहे.

Follow Us
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...