स्टेट बँकेंचं एटीएम फोडत 45 लाख लंपास, कर्ज फेडलं, बोलेरो गाडीवरही खर्च, पोलिसांनी 24 तासात मुसक्या आवळल्या

| Updated on: Mar 30, 2021 | 1:37 PM

45 लाख रुपयाची चोरी करणाऱ्या 4 आरोपींच्या मुरबाड पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. Murbad Police SBI ATM robbery

स्टेट बँकेंचं एटीएम फोडत 45 लाख लंपास, कर्ज फेडलं, बोलेरो गाडीवरही खर्च, पोलिसांनी 24 तासात मुसक्या आवळल्या
मुरबाड पोलीस
Follow us on

पालघर: मुरबाड मधील स्टेट बँकेच्या एटीएम मधून 45 लाख रुपयाची चोरी करणाऱ्या 4 आरोपींच्या मुरबाड पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. चोरी करण्यात आलेल्या रक्कमेतून एका आरोपीने 2 लाखांचे टीडीसी बँकेचे कर्ज फेडले तर दुसऱ्या आरोपीने 1 लाख 10 हजार रुपये मोटर सायकल व बोलेरो गाडी दुरुस्ती यासाठी खर्च केले. उर्वरित रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. (Murbad Police arrested four accused within 24 hours in SBI ATM robbery of 45 lakhs)

ग्राहकांना पैसे न मिळाल्यानं गुन्हा उघडकीस

गुरुवारी (25 मार्चला) सकाळी मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ग्राहक आपले पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी शाखेशी संपर्क साधला. याबाबत बँक अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 106/2021 भारतीय दंड विधान संहिता कलम 380, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन तात्काळ तपासाला सुरुवात करण्यात आली होती.

24 तासात आवळल्या मुसक्या

मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना जेरबंद केल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. तर चोरी करण्यात आलेल्या रक्कमेतून एका आरोपीने 2 लाखाचे टीडीसी बँकेचे कर्ज फेडले तर दुसऱ्या आरोपीने 1 लाख 10 हजार रुपये मोटर सायकल व बोलेरो गाडी दुरुस्ती यासाठी खर्च केले असून उर्वरित रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

आरोपी करायचा एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम

पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. कळंभाड येथील नरेश भाऊ मोरे, तुळई येथील नितीन चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी हा अन्य बँक एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करत होता. ज्या एटीएम मशीनमधून पैसे काढले गेले तिला कसल्याही प्रकारंचं नुकसान झालेले नाही. शिताफीने ही रॉबरी घडल्याचे यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले. मात्र, यापूर्वी या चोरट्यांनी काही गुन्हे केलेत का? किंवा यात आणखी कोणी सामील आहे का? याबाबत पुढील तपास सुरू आहे. तर एवढ्या जलदपणे गुन्ह्याचा तपास लावून एवढी मोठी रिकव्हरी केल्याबद्दल मुरबाड पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

VIDEO : जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी बारजवळच राडा, धुलिवंदनालाच तरुणाला बेदम मारहाण

डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला, औरंगाबादेत कॉन्स्टेबलने तक्रारदारालाच धुतलं

(Murbad Police arrested four accused within 24 hours in SBI ATM robbery of 45 lakh