IPL Auction 2026 Live: मिनी ऑक्शनमधील आतापर्यंतचे 5 महागडे खेळाडू
IPL Auction 2026 Live Updates in Marathi : आयपीएल 2026 साठीच्या मिनी ऑक्शनचं आयोजन हे अबुधाबीमध्ये करण्यात आलं आहे. या मिनी ऑक्शनमधून 10 फ्रँचायजी 77 खेळाडूंना घेण्यासाठी सज्ज आहेत. या मिनी ऑक्शनबाबत प्रत्येक अपडेट या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

LIVE Cricket Score & Updates
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अमित कुमार याला 30 लाखांचा भाव
अमित कुमार याला बेस प्राईजचा भाव मिळाला आहे. अमित कुमार सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 11 खेळाडू अनसोल्ड
सलग 11 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या खेळाडूंमध्ये डॅनिलय लॉरेन्स, तास्किन अहमद, रिचर्ड ग्लीसन, अल्झारी जोसेफ, रिले मेरडिथ, झाय रिचर्डसन, एम धीरज, तनय त्यागराजन, कॉनर एस्टरहुइझेन, इरफान उमेर आणि चिंतल गांधी यांचा समावेश आहे.
-
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कूपर कोनोली याला 3 कोटींचा भाव
कूपर कोनोली याला 3 कोटींचा भाव मिळाला आहे. कपूर पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 4 खेळाडू अनसोल्ड
सलग 4 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या चौघांमध्ये मुर्गन अश्विन, तेजस बारोओका, केसी करिअप्पा आणि मोहिती राठी अनसोल्ड ठरले.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मोहम्मद इझहार आणि ओंकार तरमाले या दोघांना प्रत्येकी 30 लाख
मोहम्मद इझहार आणि ओंकार तरमाले या दोघांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. मोहम्मद मुबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. तर ओंकार तरमाले सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करणार आहे.
-
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : साकीब हुसैन याला 30 लाख
साकीब हुसैन सोल्ड ठरला आहे. साकीब हुसैन याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. साकीबला सनरायजर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : केएम आसिफ अनसोल्ड
युवा आणि अनकॅप्ड खेळाडू केएम आसिफ अनसोल्ड ठरला आहे. केएम आसिफ याच्यासाठी कोणतीच फ्रँचायजी इच्छू दिसली नाही.
-
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलील अरोरा आणि रवी सिंह सोल्ड
सलील अरोरा आणि रवी सिंह सोल्ड ठरले आहेत. सलील अरोरा याला एसआरएचकडून दीड कोटींचा भाव मिळाला आहे. तर रवी सिंह याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 95 लाख रुपये मोजले आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मंगेश यादव मालामाल, 5 कोटींपेक्षा जास्त भाव
मंगेश यादव मालामाल झाला आहे. मंगेश यादव याला 5 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. आरसीबीने मंगेश यादव याच्यासाठी 5 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : विकी ओस्तवाल आणि मंयक रावत अनसोल्ड
विकी ओस्तवाल आणि मंयक रावत हे दोघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांसाठी कोणत्याही फ्रँचयाजीने रस दाखवला नाही. त्यामुळे या दोघांना आता पुढील हंगामाची वाट पाहावी लागणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अमन खान याला 40 लाख रुपये, कोणत्या टीमकडून खेळणार?
अनकॅप्ड अमन खान याला 40 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. अमन खान चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सात्विक देसाई गतविजेत्या आरसीबीकडून खेळणार
सात्विक देसाई गतविजेत्या आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. सात्विक देसाई याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 30 लाख रुपयात आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अक्षत रघुवंशी कोट्यधीश, 2 कोटींपेक्षा जास्त भाव
अक्षत रघुवंशी कोट्यधीश झाला आहे. अक्षतला 2 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. अक्षत 19 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्स टीमकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलमान निजार अनसोल्ड
सलमान निजार अनसोल्ड ठरला आहे. सलमान निझार याला कुणीच खरेदीदार मिळाला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : दानिश मालेवार याला 30 लाख
दानिशे मालेवार याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. दानिश मालेवार 19 व्या मोसमात आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : पुन्हा सलग तिघे अनसोल्ड
मुस्तफिजुर रहमान याच्यानंतर 3 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. चेतन सकारिया, कुलदीप सेन आणि मोहम्मद वकार सलामखेईल हे तिघे अनसोल्ड ठरले आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मुस्तफिजूर रहमानला तगडा भाव, 9 कोटी 20 लाखांसह केकेआरच्या गोटात
बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याला तगडा भाव मिळाला आहे. मुस्तफिजूर रहमान याला 9 कोटी 20 लाखांचा भाव मिळाला आहे. मुस्तफिजूर रहमान केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : पुन्हा 3 खेळाडू अनसोल्ड
कायले जेमीन्सन, एडम मिल्ने आणि लुंगी एन्गिडी हे तिघे कमनशिबी ठरले आहेत. या तिघांना 10 पैकी कोणत्याही फ्रँचायजींनी घेतलं नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : टीम सायफर्टला दीड कोटींचा भाव
टीम सायफर्ट याला मिनी ऑक्शनमध्ये दीड कोटींचा भाव मिळाला आहे. टीम सायफर्ट 19 व्या हंगामात किंग खान शाहरुख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 3 खेळाडू अनसोल्ड
मॅथ्यू शॉर्ट याच्यानंतर सलग 3 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. टॉम बँटन, जॉर्डन कॉक्स आणि जोश इंग्लिस हे तिघेही अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना खरेरीदार मिळाला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मॅथ्यू शॉर्ट याला दीड कोटी, यलो आर्मीकडून खेळणार
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू शॉर्ट याला चेन्नई सुपर किंग्स टीमने आपल्या गोटात घेतलं आहे. मॅथ्यू शॉर्टसाठी सीएसकेने दीड कोटी रुपये मोजले. मॅथ्यू शॉर्ट आता यलो आर्मीकडून खेळताना दिसणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : डॅरेल मिचेल आणि दासुन शनाका अनसोल्ड
न्यझीालंडचा डॅरेल मिचेल (2 कोटी बेस प्राईज) आणि श्रीलंकेचा दासुन शनाका (75 लाख रुपये बेस प्राईज) हे दोघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांना एक्सलरेटेड राउंडमध्येही कुणी घेतलं नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : जेसन होल़्डरला 7 कोटी, गुजरातकडून खेळणार
वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर जेसन होल्डर याला मिनी ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळाला आहे. होल्डरसाठी गुजरात टायटन्स टीमने 7 कोटी मोजले आहेत. होल्डरची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : शॉन एबेट, मायकल ब्रेसवेल आणि बेन ड्वारसुईस अनसोल्ड
ऑस्ट्रेलियाचा शॉन एबेट, मायकल ब्रेसवेल आणि बेन ड्वारसुईस हे तिघे अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांसाठी कोणत्याच फ्रँचायजीने बोली लावली नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : राहुल त्रिपाठी याचं कमबॅक, केकेआरकडून 75 लाख
राहुल त्रिपाठी याची बेस प्राईजचा भाव मिळाला आहे. राहुल त्रिपाठी याला 75 लाख रुपये मिळणार आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : पाथुम निसांकासाठी मोठी बोली, टीमकडून इतक्या कोटींचा भाव
श्रीलंकेच्या पाथुम निसांका याला तगडा भाव मिळाला आहे. पाथुमनची बेस प्राईज 75 लाख रुपये इतकी होती. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने पाथुम निसांका याच्यासाठी 4 कोटी रुपये मोजले.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : एक्सलरेटेड राउंड, सेदीकुल्लाह अटल अनसोल्ड
एक्सलरेटेड राउंडला सुुरुवात झाली आहे. या फेरीतील पहिलाच खेळाडू अनसोल्ड ठरला आहे. अफगाणिस्तानचा सेदीकुल्लाह अटल अनसोल्ड ठरला. सेदीकुल्लाह अटलसाठी कुणीच बोली लावली नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : एक्सलरेटेड राउंडला सुरुवात, 66 खेळाडूंचा फैसला होणार
एक्सलरेटेड राउंडला सुरुवात झाली आहे. एक्सलरेटेड राउंडमध्ये 66 खेळाडूंचा फैसला होणार आहे. आता पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेले खेळाडू सोल्ड होणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शनमधील आतापर्यंतचे 5 महागडे खेळाडू
कॅमरन ग्रीन, 25 कोटी 20 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
मथीशा पथिराणा, 18 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
प्रशांत वीर (अनकॅप्ड), 14 कोटी 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स
कार्तिक शर्मा, (अनकॅप्ड) 14 कोटी 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स,
आकिब नबी, 8 कोटी 40 लाख, दिल्ली कॅपिट्ल्स
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : दहाव्या फेरीत अनकॅप्ड स्पिनरचा फैसला, कोण सोल्ड कोण अनसोल्ड?
दहाव्या फेरीत अनकॅप्ड स्पिनरचा फैसला झाला आहे. या फेरीत वाहिदुल्ला झद्रान, शिवम शुक्ला, कर्ण शर्मा आणि कुमार कार्तिकेय हे 4 खेळाडू अनसोल्ड ठरले.
सोल्ड खेळाडू
विघ्नेश पुथुर, 30 लाख, राजस्थान रॉयल्स
प्रशांत सोळंकी, 30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
यश राज पुंजा , 30 लाख, राजस्थान रॉयल्स
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सुशांत मिश्रा याला 90 लाख
सुशांत मिश्रा याला 90 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. सुशांतसाठी राजस्थान रॉयल्सने 90 लाख रुपयांची बोली लावून त्याला आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : आकाश मढवाल अनसोल्ड
मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आकाश मढवाल हा अनसोल्ड ठरला आहे. आकाश मढवाल याच्यासाठी कोणत्याच टीमने बोली लावली नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : नमन तिवारी कोट्यधीश, लखनौकडून खेळणार
नमन तिवारी कोट्यधीश झाला आहे. नमनला एलसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्सकडून 1 कोटींचा भाव मिळाला आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सिमरजीत सिंह अनसोल्ड
सिमरजीत सिंह अनसोल्ड ठरला आहे. सिमरजीत सिंह याच्यासाठी कोणत्याच फ्रँचायजीने बोली लावली नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कार्तिक त्यागी याला 30 लाख
कार्तिक त्यागी याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. सर्वाधिक रक्कम घेऊन ऑक्शनमध्ये उतरलेल्या केकेआरने कार्तिकला आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : राज लिंबानी अनसोल्ड
राज लिंबानी अनसोल्ड ठरला आहे. राज लिंबानी याला आपल्या ताफ्यात घेण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अशोक शर्माला 90 लाख, गुजरातसाठी खेळणार
अशोक शर्मा याला 90 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. अशोक 19 व्या मोसमात गुजरातसाठी खेळताना दिसणार आहे. अशोक कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : नवव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांवर बोली लागणार
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधील नवव्या फेरीला सुरुवात झालीय. या फेरीत अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांवर बोली लागणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : वंश बेदी आणि तुषार रहेजा अनसोल्ड
वंश बेदी आणि तुषार रहेजा हे दोेघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांसाठी कोणत्याही फ्रँचयाजीने बोली लावली नाही. या दोघांना बेस प्राईजमध्येही कुणी खरेदीदार मिळाला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : तेजस्वी सिंह याला 3 कोटी
कोलकाता नाईट रायडर्सने तेजस्वी सिंग याला 3 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तेजस्वीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र केकेआरने बाजी मारली.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मुकुल चौधरीला कोटींचा भाव, लखनौकडून 2 कोटी 60 लाख
मुकुल चौधरी याला कोटीचा भाव मिळाला आहे. मुकलची बेस प्राईज 30 लाख रुपये इतकी होती. मात्र मुकुलसाठी एलएसजी टीमने 2 कोटी 60 लाख रुपये मोजले आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कार्तिक शर्माची चांदी, 14 कोटी 20 लाखांचा भाव
अनकॅप्ड विकेटकीपरमधील कार्तिक शर्मा याची चांदी झाली आहे. कार्तिक याला त्याच्या बॅटिंगसाठी मोठा भाव मिळाला आहे. कार्तिकसाठी सीएसके फ्रँचायजीने 14 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत. कार्तिकची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : रुचीत अहीर अनसोल्ड
अनकॅप्ड विकेटकीपर रुचीत अहीर अनसोल्ड ठरला आहे. रुचीत अहीर याच्यासाठी कोणत्याही फ्रँजायजीने बोली लावली नाही. त्यामुळे रुचीतच्या पदरी निराशा आली आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सेट नंबर 8 ला सुरुवात, अनकॅप्ड विकेटकीपरचं काय होणार?
आयपीएल 2026 मिनी ऑक्शमधील सेट नंबर 8 ला सुरुवात झाली आहे. या सेटमध्ये अनकॅप्ड विकेटकीपर खेळाडूंवर बोली लागणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : तनुश कोटीयन, कमलेश नागरकोट्टी आणि सनवीर सिंह अनसोल्ड
मिनी ऑक्शनमध्ये सलग 3 अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. मुंबईकर तनुश कोटीयन, कमलेश नागरकोट्टी आणि सनवीर सिंह अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना कुणीही घेतलं नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : शिवांग कुमारला 30 लाख रुपये, एसआरएचसाठी खेळणार
शिवांग कुमार याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. शिवांग 19 व्या मोसमात एसआरएचसाठी खेळणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : प्रशांत वीर याला कोटींचा भाव, ठरला इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड
प्रशांत वीर याने इतिहास घडवला आहे. प्रशांत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड प्रशांत वीर याला कोटींचा भाव मिळाला आहे. प्रशांतची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. मात्र प्रशांतला 14 कोटी 20 लाख रुपये इतका भाव मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायजीने प्रशांतला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 4 खेळाडू अनसोल्ड
विजय शंकर, राज्यवर्धन हंगरगेकर, महिपाल लोमरुर आणि एधन टॉम हे खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या 4 खेळाडूंसाठी कोणत्याही फ्रँचायजींनी रस दाखवला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : आकिब डार याला कोटींचा भाव
ऑलराउंडर आकीब डार याला कोटींचा भाव मिळाला आहे. आकीब डार याच्यासाठी दिल्ली कॅपिट्ल्सने 8 कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. आकीबची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सातव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड ऑलराउंडर्सचं काय होणार?
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधीर सातव्या फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत अनकॅप्ड ऑलराउंडर्सचा फैसला होणार आहे. या फेरीत कोणत्या ऑलराउंडरला किती रक्कम मिळणार? हे काही मिनिटांत स्पष्ट होईल.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सहाव्या सेटमधील सर्व फलंदाज अनसोल्ड
मिनी ऑक्शनमधील सहाव्या फेरीतील सर्व खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. हा सेट अनकॅप्ड बॅट्समनचा होता. मात्र 10 फ्रँचायजींंनी एकाही खेळाडूला घेतलं नाही. अर्थव तायडे, अनमोलप्रीत सिंह, अभिवन तेजराणा, अभिनव मनोहर, यश धुळ आणि आर्या देसाई हे अनसोल्ड ठरले आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : सहाव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड बॅट्समनचा फैसला
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधील सहाव्या फेरीला सुरुवात झाली आहे. या सहाव्या फेरीत अनकॅप्ड बॅट्समनचा फैसला होणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अकील होसेन याला 2 कोटी
वेस्ट इंडिजचा खेळाडू याला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. अकीलला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : महीश तीक्षणा-मुजीब उर रहमान अनसोल्ड
महीश तीक्षणा आणि मुजीब उर रहमान अनसोल्ड राहिले आहेत. या दोघांना कुणीही घेतलं नाही. या दोघांची झटपट फेरीत निवड होणार का? याकडे लक्ष असणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : रवी बिश्नोईला 7 कोटी 20 लाख रुपयांचा भाव
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू याला त्याच्या बेस प्राईजपेक्षा कित्येक पट जास्त रक्कम मिळाली आहे. रवीला राजस्थानने 7 कोटी 20 लाख रुपयात आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : फिरकी गोलंदांजाच्या फेरीला सुरुवात, राहुल चहर अनसोल्ड
फिरकी गोलंदांजाच्या फेरीला सुरुवात झाली आहे. राहुल चहर अपयशी ठरला आहे. राहुल चहर अनसोल्ड ठरला आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्खिया आणि फझलहक फारुकी अनसोल्ड
स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्खिया आणि फझलहक फारुकी हे तिघे वेगवान गोलंदाज अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना खरेदीदार मिळाला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मथीशा पथिराणा याला 18 कोटींचा भाव
श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पथीराणा याला 18 कोटींचा भाव मिळाला आहे. मथिशा आयपीएलमधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे. केकेआरने मथिशाला घेतलं आहे. मथिशाची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : गेराल्ड कोएत्झी अनसोल्ड
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याच्या पदरी निराशा आली आहे. गेराल्ड कोएत्झी अनसोल्ड ठरला आहे. कोएत्झीसाठी कोणत्याच संघाने बोली लावली नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : शिवम मावी अनसोल्ड
टीम इंडियाचा शिवम मावी अनसोल्ड ठरला आहे. शिवमची बेस प्राईज ही 75 लाख रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : जेकब डफी याला 2 कोटींचा भाव
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. आरसीबीने जेकबला त्याच्या बेस प्राईजमध्ये घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : आकाश दीप अनसोल्ड
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप अनसोल्ड ठरला आहे. आकाश दीप याची बेस प्राईज 1 कोटी रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : न्यूझीलंडचा मॅट हेन्री अनसोल्ड
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अनसोल्ड ठरला आहे. मॅटची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : चौथ्या फेरीला सुरुवात, वेगवान गोलंदाजांचा निकाल लागणार
मिनी ऑक्शनमधील चौथ्या फेरीला सुरुवात झाली आहे. या चौथ्या फेरीत वेगवान गोलंदाजांवर बोली लावण्यात येणार आहे. त्यामुळे कोणते गोलंदाज सोल्ड ठरणार आणि कोण अनसोल्ड राहणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : बेन डकेट आणि फिन एलनला 2 कोटींचा भाव
इंग्लंडचा बेन डकेट आणि न्यूझीलंडचा फिन एलेन या दोघांना प्रत्येकी 2 कोटींचा भाव मिळाला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने डकेटला घेतलं आहे. तर केकेआरने फिन एलेन याला घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : रहमानुल्ला, जॉनी बेयरस्टो आणि जेमी स्मिथ अनसोल्ड
रहमानुल्ला गुरुबाज, जॉनी बेयरस्टो आणि जेमी स्मिथ हे विकेटकीपर खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांनाही कोणत्याच फ्रँचायजीने घेण्यात रस दाखवला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मुंबईची मोठी खेळी, क्विंटन डी कॉक 1 कोटीत पलटणमध्ये
मुंबई इंडियन्सने स्वस्तात मस्त डील केली आहे. मुंबईने विकेटकीपर ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉक याला 1 कोटी रुपयात आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : तिसऱ्या फेरीला सुरुवात, विकेटकीपर केएस भरत अनसोल्ड
तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. विकेटकीपर केएस भरत अनसोल्ड ठरला आहे. केएसची बेस प्राईज ही 75 लाख रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : दीपक हुड्डा अनसोल्ड
भारतीय खेळाडू दीपक हुड्डा अनसोल्ड ठरला आहे. दीपक हुड्डा याच्यासाठी कोणत्याच फ्रँचायजीने रस दाखवला नाही. त्यामुळे दीपकला एक्सलेशन राउंडमध्ये खरेदीदार मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : वेंकटेश अय्यर याला 7 कोटींचा भाव, गतविजेत्या आरसीबीसाठी खेळणार
ऑलराउंडर वेंकटेश अय्यर याला त्याच्या बेस प्राईजपेक्षा 5 कोटी जास्त भाव मिळाला आहे. वेंकटेशची बेस प्राईज 2 कोटी होती. मात्र त्याला 7 कोटी मिळाले आहेत. गतविजेत्या आरसीबीने त्याला घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : वानिंदु हसरंगा याला 2 कोटी, लखनौसाठी खेळणार
श्रीलंकेचा ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याला त्याच्या बेस प्राईजचाच भाव मिळाला आहे. लखनौ सुपर जायंट्सने वानिंदुला 2 कोटी रुपयांमध्ये घेतलं आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : गस एटकीन्सन, रचीन रविंद्र, लियाम लिविंगस्टोन आणि वियान मुल्डर अनसोल्ड
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत कॅप्ड ऑलराउंडर यांच्यावर बोली लावणयात येत आहे. गस एटकीन्सन, रचीन रविंद्र, लियाम लिविंगस्टोन आणि वियान मुल्डर हे चौघे अनसोल्ड ठरले आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कॅमरुन ग्रीन सर्वात महागडा विदेशी खेळाडू, पृथ्वी-सर्फराज अनसोल्ड, पहिली फेरी पू्र्ण
आयपीएल मिनी ऑक्शन 2026 मधील पहिली फेरी पार पडली आहे. पहिल्या फेरीतच इतिहास घडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. केकेआरने ग्रीनसाठी 25 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत. तर जेक फ्रेजर मॅकग्रूक, पृथ्वी शॉ, डेव्हॉन कॉनव्हे आणि सर्फराज खान हे चौघे अनसोल्ड ठरले. तर दिल्ली कॅपिट्ल्सने डेव्हीड मिलर याला 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये आपल्या टीममध्ये घेतलं.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कॅमरुन ग्रीन सर्वात महागडा विदेशी खेळाडू, 25 कोटींपेक्षा जास्त भाव
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर याला त्याच्या बेस प्राईज पेक्षा कित्येक पट अधिक रक्कम मिळाली आहे. कॅमरुन ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विेदेशी खेळाडू ठरला आहे. याची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. तर त्याला केकेआरकडून 25.20 कोटी इतका भाव मिळाला आहे. कॅमरुनसाठी अनेक फ्रँचायजींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र केकेआरने सर्वोच्च बोली लावून ग्रीनला आपल्या गोटात घेतलं.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : डेव्हॉन कॉनव्हे अनसोल्ड
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डेव्हॉन कॉनव्हे याला पहिल्या फेरीत कोणत्याही फ्रँचायजीने घेतलेलं नाही. डेव्हॉन कॉनव्हे हा अनसोल्ड राहिला आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : पृथ्वी शॉ अनसोल्ड, फलंदाजाच्या पदरी पुन्हा निराशा
पृथ्वी शॉ याच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला आहे. पृथ्वीची बेस प्राईज ही 75 लाख रुपये इतकी होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अबुधाबीत मिनी ऑक्शनच्या थराराला सुरुवात, डेव्हीड मिलरला 2 कोटींचा भाव
विस्फोटक फलंदाज डेव्हीड मिलर याला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने मिलरला त्याच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं आहे. दिल्लीला ही मोठी लॉटरी लागल्याचं समजलं जात आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : जेक फ्रेजर मॅकग्रॅक अनसोल्ड
जेक फ्रेजर मॅकग्रॅक हा पहिलाच खेळाडू अनसोल्ड ठरला आहे. जेक फ्रेजर मॅकग्रॅक याला घेण्यासाठी कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : अबुधाबीत मिनी ऑक्शनच्या थराराला सुरुवात, 369 खेळाडूंचा होणार फैसला
अबुधाबीत मिनी ऑक्शनच्या थराराला सुरुवात झाली आहे. एकूण 10 फ्रँचयाजीचे मालक आणि त्यांचे सहकारी मिनी ऑक्शनमधून आपल्या गरजेनुसार आणि उपलब्ध रक्कमेनुसार खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी उत्सूक आहेत. एकूण 10 फ्रँचायजींना या मिनी ऑक्शनमधून जास्तीत जास्त 77 खेळाडूंना घेता येणार आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शन कुठे पाहता येणार?
आयपीएल 2026 मिनी ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह ऑक्शन पाहायला मिळेल.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मल्लिका सागर ऑक्शनरच्या भूमिकेत
यंदाच्या मिनी ऑक्शमध्ये ऑक्शनर म्हणून मल्लिका सागर असणार आहेत. मल्लिका सागर याआधीही आयपीएलमध्ये ऑक्शनर म्हणून राहिल्या आहेत. मल्लिका सागर या आयपीएलमधील पहिल्या महिला ऑक्शनर आहेत.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कोणत्या टीमला किती खेळाडूंची गरज?
नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायजी टीममध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडू घेऊ शकते. यात विदेशी खेळाडूंचाही समावेश असणं बंधनकारक आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या कोणत्या टीमकडे एकूण किती खेळाडू (भारतीय+विदेशी) आहेत? तसेच किती खेळाडूंची (भारतीय+विदेशी) गरज आहे? हे जाणून घेऊयात.
केकेआरला सर्वाधिक खेळाडूंची गरज, पाहा आकडे
Here’s a look at the available slots for all 🔟 teams ahead of the #TATAIPL auction 2026 👀
Follow the #TATAIPLAuction 2026 on December 16 on https://t.co/4n69KTSZN3 💻 pic.twitter.com/ImZSbg8dIW
— IndianPremierLeague (@IPL) December 14, 2025
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शनसाठी अचानक 19 खेळाडूंचा समावेश
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनसाठी ऐनवेळेस 19 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. त्यामुळे मिनी ऑक्शनमधील सहभागी खेळाडूंचा आकडा हा 369 इतका झाला आहे. त्याआधी बीसीसीआयने 9 डिसेंबरला 350 खेळाडूंची नावं जाहीर केली होती.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : कोणत्या टीमकडे किती रक्कम बाकी? जाणून घ्या
मिनी ऑक्शनसाठी सर्वाधिक रक्कम ही केकेआरकडे आहे. तर सर्वात कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे. कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे? हे जाणून घेऊयात.
कोणत्या टीमकडे किती रक्कम?
Here’s a look at the remaining purse of all 🔟 teams ahead of the #TATAIPLAuction 2026 👀
How is your team placed heading into the auction? 🤔#TATAIPL pic.twitter.com/1xKSPuwTLe
— IndianPremierLeague (@IPL) November 16, 2025
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शनमध्ये 369 खेळाडू, कुणाची किती बेस प्राईज?
आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची किमान बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी आहे. तर जास्तीत जास्त बेस प्राईज ही 2 कोटी इतकी आहेत. एकूण 40 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी निश्चित केली आहे.
तसेच 9 खेळाडूंची बेस प्राईज 1 कोटी 50 लाख रुपये आहे. तर 4 खेळाडूंच्या बोलीला 1 कोटी 25 लाख रुपयांपासून सुरुवात होईल. तसेच 44 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज 75 लाख रुपये निश्चित केली आहे.
तसेच या मिनी ऑक्शमध्ये 4 खेळाडूंची बेस प्राईज 50 लाख आहे. तर 7 खेळाडूंची बेस प्राईज ही 40 लाख इतकी आहे. तर तब्बल 235 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज ही सर्वात कमी अर्थात 30 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे.
-
IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शनमध्ये 369 खेळाडूंचा फैसला होणार
खेळाडूंना आणि क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2026 मिनी ऑक्शनची प्रतिक्षा होती. थोड्याच वेळात मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहेत. या मिनी ऑक्शनचं आयोजन हे अबुधाबीत करण्यात आलं आहे. या मिनी ऑक्शनच्या थराराला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शनध्ये 369 खेळाडूंचा निकाल लागणार आहे. मिनी ऑक्शमध्ये 369 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. तसेच ऑक्शनसाठी निवड करण्यात आलेल्या एकूण 369 पैकी 253 खेळाडू हे भारतीय आहेत. त्यात 16 कॅप्ड खेळाडू आहेत. तर 116 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 10 फ्रँचायजींना 369 पैकी फक्त आणि जास्तीत जास्त 77 खेळाडूंचीच गरज आहे. त्या 77 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 31 जागा या विदेशी खेळाडूंच्या आहेत. आता कोणती फ्रँचायजी कोणत्या खेळाडूला आपल्या गोटात घेण्यात यशस्वी ठरणार? हे आपण लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Published On - Dec 16,2025 12:50 PM
