AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Mini Auction : मुंबई इंडियन्सच्या या माजी खेळाडूसाठी 35 कोटी मोजावे लागले तरी खर्च करा, मिना ऑक्शनआधी KKR ला मोलाचा सल्ला

IPL 2026 Mini Auction : मुंबई इंडियन्सच्या एका माजी खेळाडूला विकत घेण्यासाठी 35 कोटी रुपये मोजावे लागले तरी चालतील असा कोलकाता नाइट रायडर्सला मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सकडून 2023 मध्ये तो खेळला. त्यावेळी त्याच्यासाठी मुंबईच्या फ्रेंचायजीने 17.5 कोटी रुपये मोजले होते.

IPL 2026 Mini Auction : मुंबई इंडियन्सच्या या माजी खेळाडूसाठी 35 कोटी मोजावे लागले तरी खर्च करा, मिना ऑक्शनआधी KKR ला मोलाचा सल्ला
IPL 2026 Mini AuctionImage Credit source: bcci
| Updated on: Dec 16, 2025 | 12:45 PM
Share

आज 16 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीच्या एतिहाद एरिना येथे दुपारी 2.30 वाजता लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. IPL 2026 मिनी ऑक्शनआधी माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने त्यांची पूर्व टीम कोलकाता नाइट रायडर्सला काही सल्ले दिले आहेत. कॅमरुन ग्रीनला विकत घेण्यासाठी कितीही पैसा मोजावा लागला तरी खर्च करा असा सल्ला उथप्पाने दिला आहे. कॅमरुन ग्रीन अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. नंतर तो RCB कडे होता. कॅमरुन ग्रीन आयपीएलमध्ये 2023 आणि 2024 असे दोन सीजन खेळला आहे. मुंबई इंडियन्सकडून 2023 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 2024 मध्ये खेळला आहे. मुंबईने त्याला विकत घेण्यासाठी 17.5 कोटी रुपये मोजले होते.

मॉक आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये रॉबिन उथप्पा सहभागी झालेला. तिथे जिओहॉटस्टारवर तो बोलत होता. ‘कॅमरुन ग्रीन सारख्या खेळाडूसाठी 35 कोटी मोजायलाही तयार असलं पाहिजे’ असं उथप्पा म्हणाला. “मला माहितीय CSK सुद्धा या मधल्याफळीतल्या ऑलराऊंडरसाठी सर्व ताकद लावेल. मला वाटतं त्यांची 25 ते 28 कोटी खर्च करण्याची तयारी असेल. प्रत्यक्ष लिलावाच्यावेळी ते ग्रीनसाठी 20 कोटी रुपयापर्यंत खर्च करु शकतात. मी मॉक ऑक्शनमध्ये मी ग्रीन सारख्या प्लेयरसाठी 35 कोटीही मोजायला तयार आहे. ग्रीनने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करावी” असं रॉबिन उथप्पा म्हणाला.

मिनी ऑक्शनच तो आकर्षण असेल

ग्रीनला जेव्हा मुंबई इंडियन्सने घेतलं, त्यावेळी आकाश अंबानी म्हणालेले की, तो दीर्घकाळ फ्रेंचायजीसोबत राहिलं. पण वर्षभरानंतर त्याला RCB बरोबर ट्रेड करण्यात आलं. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला घेण्यात आलं. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये दुखापतीमुळे ग्रीनच्या नावाचा पुकार झाला नाही. पण मिनी ऑक्शनच तो आकर्षण असेल. तो केकेआरच्या फायद्याचा ठरेल. ऑलराऊंडर आंद्रे रसेल आयपीएलमध्ये दिसणार नाही. त्याने रिटायरमेंट घेतली आहे. सीएसकेला सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये ऑलराऊंडरची गरज आहे.

अखेरच्या ओव्हर्समध्ये तो जास्त घातक

उथप्पा मिनी ऑक्शनमध्ये केकेआरच प्रतिनिधीत्व करत होता. माथीशा पाथीराणाला 13 कोटीला विकत घेतलं. केकेआरचा कोचिंग स्टाफ आणि श्रीलंकन खेळाडू एक चांगलं मिश्रण आहे. अखेरच्या ओव्हर्समध्ये तो जास्त घातक ठरतो असं उथप्पा म्हणाला.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.