ऐकावं ते भयंकरच! मंगळवारी मटन केल्याने वाजलं, नवराबायकोचं भांडण सोडवायला शेजारी गेला अन्…

| Updated on: Oct 20, 2022 | 1:48 PM

आरोपी पप्पूच्या पत्नीच्या तक्रारीनंतर बल्लूला अटक करण्यात आली आहे. पप्पू हा मजदूरी करतो. मंगळवारी मटण बनविल्याच्या कारणावरून पत्नीशी झगडा झाला.

ऐकावं ते भयंकरच! मंगळवारी मटन केल्याने वाजलं, नवराबायकोचं भांडण सोडवायला शेजारी गेला अन्...
मंगळवारी मटन केल्याने वाजलं, नवराबायकोचं भांडण सोडवायला शेजारी गेला अन्...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भोपाळ: मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये (bhopal) एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने मंगळवारी मटण (mutton) केल्याने पत्नी संतापली. शब्दाला शब्द लागला आणि नवरा बायकोचं भांडण हातघाईवर आलं. पत्नी शब्दाला शब्द लावत असल्याने नवऱ्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पत्नी जोरजोरात ओरडायला लागली. वाचवा वाचवाचा टाहो तिने फोडला. त्यामुळे शेजारी राहणारा तरुण या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी गेला. पण या भांडणात त्याला स्वत:चा जीव गमवावा (murder) लागला. या घटनेमुळे संपूर्ण भोपाळ हादरून गेलं आहे.

भोपाळच्या बिलखिरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर मोहल्ल्यात ही घटना घडली. पप्पू अहिरवार हा आपल्या घरात मटण तयार करत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीला प्रचंड राग आला. मंगळवारी घरी मटण बनविण्याचं कारणच काय? असा सवाल तिने केला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

हे सुद्धा वाचा

शाब्दिक चकमकीवरून प्रकरण मारहाणीवर आलं. संतप्त पप्पूने पत्नीला मारहाण सुरू केली. त्यामुळे वाचवा… वाचवा… म्हणत तिने मदतीची यातना केली. शेजारी भांडण सुरू असल्याचं पाहून बाजूलाच राहणारा बल्लू त्यांच्या घरी आला. त्याने या दोघांचीही समजूत काढत त्यांचं भांडण थांबवणअयाचा प्रयत्न केला. त्यात त्याला यशही आलं. थोडावेळ नवरा बायकोचं भांडण थांबलं.

नवरा बायकोचं भांडण थांबल्याचं पाहून बल्लूही त्याच्या घरी गेला.मात्र त्यानंतर पप्पू दांडका घेऊन बल्लूच्या घरी गेला आणि त्याने बल्लूला दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आत हल्ला झाल्याने बल्लूही भांबावून गेला. प्रतिकार करण्याआधीच दांडक्याचे ठोसे बसल्याने तो घायाळ झाला. दांडक्याचे प्रहार बसल्याने तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याला तशाच अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपी पप्पूच्या पत्नीच्या तक्रारीनंतर बल्लूला अटक करण्यात आली आहे. पप्पू हा मजदूरी करतो. मंगळवारी मटण बनविल्याच्या कारणावरून पत्नीशी झगडा झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच बल्लूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील चतुर्वेदी यांनी दिली.