बँकेतून पैसे काढायला गेलेल्या दिवाणजीला चोरट्यांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद

दिवाणजी आपली दुचाकी उभी करून मित्राच्या ऑफिसमध्ये जाताच आरोपीने संधी साधली आणि त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली 4 लाख 75 हजार रुपये असलेली बॅग लंपास केली.

बँकेतून पैसे काढायला गेलेल्या दिवाणजीला चोरट्यांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
लाखोंची रक्कम चोरून चोरट्यांचा पोबारा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Oct 20, 2022 | 3:32 PM

नागपूर : बँकेतून पैसे काढणाऱ्या इसमाचा पाठलाग करुन त्याला गाडीतील रोख रक्कम घेऊन (Cash Stolen) चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मात्र ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. याप्रकरणी कपिल नगर पोलीस ठाण्यात (Kapil Nagar Police Station) चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याचा दिवाणजी बँकेत पैसे काढायला गेला होता. यावेळी चोरट्यांनी त्याचा नकळत पाठलाग केला. दिवाणजी आपली दुचाकी उभी करून मित्राच्या ऑफिसमध्ये जाताच आरोपीने संधी साधली आणि त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली 4 लाख 75 हजार रुपये असलेली बॅग लंपास केली.

काय आहे सीसीटीव्हीत?

सीसीटीव्हीमध्ये दिसणारे हे दोन चोरटे फारच शातीर आहेत. ज्या गाडीच्या डीकीमध्ये 4 लाख 75 हजार ठेवले आहे. त्या गाडीच्या जवळपास एक हेल्मेट घालून फोनवर बोलताना तर दुसरा आजूबाजूला नजर ठेवताना दिसून येतो. या दोघांनीही आधीच सगळी रेकी केली होती.

एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याचा दिवाणजी बँकेमध्ये चेक घेऊन पैसे काढायला गेला ते यांनी बघितलं आणि तो बँकेतून निघताच त्याला माहित होणार नाही अशा प्रकारे त्यांनी याचा पाठलाग केला. दिवाणजी आपली दुचाकी उभी करून बाजूला असलेल्या मित्राच्या कार्यालयात गेला.

मात्र तेवढ्यातच आपली गाडी काही अंतरावर उभी करून ते त्याच्या गाडीजवळ आले. त्याच्या गाडीजवळ फोनवर बोलत असल्याचं नाटक करत गोल गोल फिरले आणि संधी साधून या गाडीची डिक्की उघडली आणि बॅग घेऊन सुसाट पळाले.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

हे सगळं दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलीस आता या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत. या चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे वातावरण निर्मिती केली. त्यावरून त्यांच्यावर संशय येणं कठीण होतं आणि त्याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला. मात्र आता हे पोलिसांच्या रडारवर आले आहे.