Crime : नागपूरमधील 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक, स्केचमुळे लागला शोध

नागपूरमध्ये पोलिसांनी आरोपीचा स्केचच्या आधारावरून शोध घेतला आहे. आठ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आलं आहे.

Crime : नागपूरमधील 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक, स्केचमुळे लागला शोध
| Updated on: Sep 21, 2024 | 4:51 PM

नागपूरमध्ये चार दिवसांपूर्वी (17 सप्टेंबर) आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. घरामध्ये वडील आहेत का विचारत चिमुकलीवर घरात घुसून नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली होती. पोलिसांना आरोपीचे स्केच बनवत शोध घेण्यात यश आलं आहे.

पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार करणाऱ्या 56 वर्षीय आरोपीला अखेर पारडी पोलिसांनी अटक केलेली आहे. 56 वर्षीय व्यक्ती असून छोटोसे दुकान चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर पोलिसांना ओळख पटत नसल्यानं आरोपीचे स्केच तयार करून शोध घेण्यात आला. अखेर त्याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतल असून आज कोर्टात हजर करणार आहे.

घटनेच्या दिवशी तो घटनास्थळी पंडित शोधायला आला होता. त्यावेळी दोन मुलींना सुद्धा विचारणा केली. यातील घरात कुणी नसल्याचं पाहून त्याने पाच वर्षीय चिमुकलीला घराबाहेर ठेवून 8 वर्षीय मुलीला घरात नेऊन अत्याचार करून पसरा झाला होता. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कडून आज पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना जाब विचारणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. उबाठाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर, आज पारडी पोलीस स्टेशनला जाणार आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस महिला आणि तरूणींसह लहान चिमुकींवरही नराधम अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत  आहे. लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.