शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी

देऊळगाव राजा जवळ भाविकांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव - जालना महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झाला.

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी
बुलडाण्यात कार ट्रकचा भीषण अपघात
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 10:08 AM

बुलडाणा : बोलेरो कार आणि ट्रक यांचा भीषण अपघात (Car Truck Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर देऊळगाव राजा जवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये कार चालकाचाही समावेश आहे. तर चौघे जण जखमी झाले आहेत. जालना येथून शेगाव (Shegaon) येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यावेळी बोलेरो कारची ट्रकसोबत भीषण धडक झाली. सोमवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

देऊळगाव राजा जवळ भाविकांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झाला.

या अपघातात पाच जण जागीच मृत्युमुखी पडले असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

शेगावला जाताना अपघात

अपघातग्रस्त बोलेरो गाडी भाविकांना घेऊन जालना येथून शेगाव येथे गजानन महाराज दर्शनासाठी निघाली असल्याची माहिती आहे. जखमींवर देऊळगाव राजा तसेच जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली होती.

संबंधित बातम्या :

भारतीय विद्यार्थ्यांचा कॅनडात भीषण कार अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

वर्ध्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अपघातात लहान मुलाचा समावेश

 काळजाचा ठोका चुकवणारी घटना: दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू