VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप

भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या प्रकरणानंतर नागपुरात भाजप-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. कुकरेजा यांनी काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप
नागपुरात भाजप नगरसेवकाकडून मारहाण
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 8:18 AM

नागपूर : नागपुरात भाजप नगरसेवकाने (BJP Corporator) काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा (Vickey Kukareja) यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचे व्हिडीओ फूटेज समोर आले आहे. काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान यांना मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. उत्तर नागपूर (Nagpur) काँग्रेस कमिटीचे अनिल नगरारे आणि सुरेश पाटील यांनी यासंदर्भात पुरावे सादर केले आहेत. काँग्रेसकडून पोलिसांना पुरावे सादर केले जाणार आहेत. मात्र पोलिस आरोपीला वाचवत असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विक्की कुकरेजा यांच्याकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या प्रकरणानंतर नागपुरात भाजप-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. कुकरेजा यांनी काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेची चित्रफीतही समोर आली आहे.

काँग्रेसकडून मारहाणीचे पुरावे

उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीचे अनिल नगरारे आणि सुरेश पाटील यांनी यासंदर्भातील पुरावे समोर आणले आहेत. काँग्रेसकडून पोलिसांना पुरावे सादर केले जाणार आहेत. मात्र पोलिस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. विक्की कुकरेजा यांच्याकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण

किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं, साताऱ्यात अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? ‘बाल’प्रेयसीचा पारा चढला, वर्ध्यात 15 वर्षांच्या मैत्रिणीलाच बदडलं