माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? ‘बाल’प्रेयसीचा पारा चढला, वर्ध्यात 15 वर्षांच्या मैत्रिणीलाच बदडलं

16 वर्षीय मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने 15 वर्षीय मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवर घडली.

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? 'बाल'प्रेयसीचा पारा चढला, वर्ध्यात 15 वर्षांच्या मैत्रिणीलाच बदडलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:36 AM

वर्धा : लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नकळत्या वयात होणारी प्रेम प्रकरणं (Love Affair), विरह, दुरावे, ब्रेक अप आणि त्यातून वाढणारी भांडणं, वादावादी आणि गुन्हेगारी. एकीकडे थेरगावच्या पोरीची थेरं ताजी असतानाच, एका अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने 15 वर्षीय मुलीला बदडल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. दुखापतग्रस्त मुलीवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या प्रियकराला मेसेज का केलेस, असं म्हणत 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या कथित प्रियकराने पीडित मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

16 वर्षीय मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने 15 वर्षीय मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवर घडली.

“माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस?”

15 वर्षीय मुलगी शिकवणीमध्ये बसून असताना 16 वर्षीय मुलीच्या ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला. शिवीगाळ करुन धमकी देत त्याने पीडितेला आयटीआय टेकडी परिसरात बोलवले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तिथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ केली. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस, असे म्हणत 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तिथे उपस्थित असलेल्या तिच्या मित्र मैत्रिणींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. जखमी मुलीला सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

जखमी मुलीचा जबाब

घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

 मुजोर रिक्षाचालकांनी औरंगाबादेत गुंडगिरी, प्रवाशाला बेदम मारहाण, भररस्त्यात राडा!

प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी

भंडाऱ्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजमधून घरी येऊन उचललं धक्कादायक पाऊल

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.