VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी

एसटी बंद असल्याने प्रवाशांची गर्दी होत आहे. यावेळी गाडी भरण्यावरुन खासगी वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. औरंगाबाद शहरामधील सिडको बस स्थानकाजवळ असा प्रकार घडल्याचं दिसलं.

VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी
औरंगाबादमध्ये खासगी वाहन चालकांमध्ये वाद

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही बस बंद आहेत. मात्र बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अद्यापही रोडावलेली नाही. प्रवाशांची ओढाओढ करताना खासगी वाहन चालकांमध्ये अक्षरशः हाणामारी होत असल्याचं पाहायला मिळालं.

फ्री-स्टाईल हाणामारी

एसटी बंद असल्याने प्रवाशांची गर्दी होत आहे. यावेळी गाडी भरण्यावरुन खासगी वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. औरंगाबाद शहरामधील सिडको बस स्थानकाजवळ असा प्रकार घडल्याचं दिसलं.

नागरिकांनी वाद मिटवला

दोन वाहन चालकांमध्ये मारहाण झाली. मात्र यावेळी आसपास असलेल्या नागरिकांनी दोघांमधील वाद मिटवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारीचा हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

खासगी वाहन चालकांची ओढाओढी

एकीकडे एसटी बस बंद असल्यामुळे परगावी प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे. तर दुसरीकडे खासगी वाहन चालकांनी आपल्या किमती वाढवल्या आहेत. सोबतच प्रवाशांना आपल्याकडे ओढून घेण्याच्या नादात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात वाद वाढल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी

पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

Jawan Firing | सुट्टी नाकारल्याचा राग, जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

Published On - 2:23 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI