VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी

दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात कोल्ड्रिंक्सने भरलेल्या ट्रकला मोठा अपघात झाला. अपघातानंतर कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी
औरंगाबादमध्ये कोल्डड्रिंक्स नेणाऱ्या ट्रकला अपघात

औरंगाबाद : बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात कोल्ड्रिंक्सने (Cold Drinks Truck Accident) भरलेल्या ट्रकला अपघात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) धुळे सोलापूर हायवेवर हा प्रकार घडला. मात्र अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाला मदत करण्याऐवजी बघ्यांनी कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी गर्दी केली.

दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात कोल्ड्रिंक्सने भरलेल्या ट्रकला मोठा अपघात झाला. अपघातानंतर कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवर हा अपघात झाला होता.

नेमकं काय घडलं?

रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सच्या शेकडो बाटल्या पळवल्या. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
गुजरातमधील अहमदाबादवरुन हा कोल्ड्रिंक्सने भरलेला ट्रक औरंगाबादला येत होता. अपघातानंतर अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सचे बॉक्सच्या बॉक्स पळवले. कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पळवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड

याआधी, अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोलापूर पुणे महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला होता. त्यानंतर मदत करण्याऐवजी परिसरातील नागरिकांनी कोंबड्या पळवण्यासाठी गर्दी केली होती. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली होती.

संबंधित बातम्या :

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा

Published On - 11:53 am, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI