साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

prajwal dhage

| Edited By: |

Updated on: Jan 02, 2021 | 5:36 PM

कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाला कोणतीह इजा झालेली नाही. (chicken tempo accident)

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

सातारा : कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (chicken tempo accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाला कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. (Accident of tempo in satara carrying hen)

मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात कराड -ढेबेवाडी रस्त्यावर टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील काढणे फाट्याजवळ हा टेम्पो आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटला. त्यामुळे टेम्पोत असलेल्या जवळपास 600 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.

या अपघातात चालकाला कोणतीही इजा झाली नाही. घटनेची माहिती होताच शेतातील शेतकरी आणि इतर प्रवासी यांनी तत्काळ मदतकार्य केले. मात्र तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचे लाखो रुपयांचे नुसकान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गाडीचे ब्रेक बिघडल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

मध्य प्रदेशात ट्रक उलटला आणि कोंबड्यांची लूट

पाच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील बडवानी भागात अशीच एक घटना घडली होती. येथे कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ही गर्दी अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी नाही, तर कोंबड्या पळवून नेण्यासाठी झाली होती. यावेळी अपघात झालेल्या ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी अर्ध्या मृत्युमुखी पडल्या होत्या. तर 300 ते 400 कोंबड्यांची बाकीच्या लोकांनी लूट केली होती.

पिक अप चालकाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालेगावहून कोंबड्या खिलचीपूरला नेल्या जात होत्या. सेंधवा कुशलगड राज्य महामार्गावर असताना दोंडवाडा गावाजवळ एक गाय ट्रकसमोर आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला. ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी 600 ते 700 मृत्युमुखी पडल्या, तर 300 ते 400 कोंबड्यांची लूट झाली.

संबंधित बातम्या :

Rekha Jare Murder | बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

(Accident of tempo in satara carrying hen)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI