मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला. (Young Girl Killed During New Year Party In Khar)

Namrata Patil

|

Jan 02, 2021 | 12:03 AM

मुंबई : एकीकडे संपूर्ण भारतात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना, दुसरीकडे मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Young Girl Killed During New Year Party In Khar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात भगवती हाईट्स नावाची इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवर काल नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी दारु प्यायली होती.

पार्टी सुरु झाल्यानंतर ती मृत मुलगी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. त्या मृत मुलीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला.

काही वेळाने हा वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने त्या मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीला मारहाण करणाऱ्या त्या जोडप्याला अटक केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम 302, 34 अंतर्गत चौकशी केली आहे. तसेच पार्टीत उपस्थित असलेल्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

खारमधील भगवती हाईट्स या इमारतीच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ही घटना घडली. त्यामुळे 31 डिसेंबरला गच्चीत कोणत्याही प्रकारची पार्टीची परवानगी नसतानाही पार्टी कशी काय आयोजित केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवरीही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. (Young Girl Killed During New Year Party In Khar)

संबंधित बातम्या : 

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तन्वीला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न? सासरच्यांवर आरोप

जन्मदात्या आईनेच दोन जुळ्या मुलींपैकी एकीची केली हत्या, पाण्याच्या टाकीत बुडवून कायमचं संपवलं

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें