जन्मदात्या आईनेच दोन जुळ्या मुलींपैकी एकीची केली हत्या, पाण्याच्या टाकीत बुडवून कायमचं संपवलं

जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पोटच्या जुळ्या दोन मुलींपैकी एका दोन महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून संपविल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे.

जन्मदात्या आईनेच दोन जुळ्या मुलींपैकी एकीची केली हत्या, पाण्याच्या टाकीत बुडवून कायमचं संपवलं
प्रातिनिधिक फोटो

वसई : सरत्या वर्षाला निरोप आणि नाव वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना वसईत मात्र हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पोटच्या जुळ्या दोन मुलींपैकी एका दोन महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून संपविल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (vasai crime Mother kills one and a half month old daughter by drowning in a water tank)

वसईतल्या पाचूबंदर परिसरात हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्रूरकर्मा मुलीच्या आईला अटक केली आहे. सदर घटनेने वसई परिसरात आरोपी महिलेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जन्म देणाऱ्या आईनेच 2 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केली आहे. आरोपी महिला वसई पाचूबंदर इथे आपल्या कुटुंबासोबत राहते. तिचा पती बोटीवर मासेमारी करतो. महिलेला दोन महिन्यांपूर्वी 2 जुळ्या मुली झाल्या होत्या. इतकंच नाहीतर तिच्या जावेलासुद्धा दोन मुलीचं आहेत. घरात मुलीच झाल्याने हे कुटुंब अश्वस्थ होते. तसेच दोन जुळ्या मुली असल्याने आरोपी महिलेला दोघींना सांभाळणे ही कठीण होत होते.

बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन आरोपी महिलेने आपल्या स्वता:च्या मुलीला उचलून छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केली आहे. घरातील व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलीची चौकशी केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (vasai crime Mother kills one and a half month old daughter by drowning in a water tank)

संबंधित बातम्या – 

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

(vasai crime Mother kills one and a half month old daughter by drowning in a water tank)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI