रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तन्वीला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न? सासरच्यांवर आरोप

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तन्वीला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न? सासरच्यांवर आरोप

राजधानी दिल्लीत एका उच्चभ्रू कुटुंबात हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय.

Nupur Chilkulwar

|

Jan 01, 2021 | 3:14 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका उच्चभ्रू कुटुंबात हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय  (Delhi Dowry Case). या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीची समस्या किती खोलवर रुजलीय हे सिद्ध होतं. तन्वी बेनिवाल असं विवाहितेचं नाव असून हुंड्यासाठी नवरा, सासरा आणि सासूनं तिचा छळ केल्याचं उघड झालंय. उत्तर दिल्लीच्या रूपनगर पोलीस ठाण्यात तसा रितसर गुन्हाही दाखल झालाय. हुंड्यासाठी तन्वीचा नेहमीच छळ केला जात होता असा आरोप तन्वीच्या माहेरच्यांनी केलाय. तन्वी सध्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतेय  (Delhi Dowry Case).

याबाबत तन्वीच्या आई सुनिता बेनीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलाचं लग्न करण्यासाठी तन्वीच्या सासरच्यांनी आम्हाला पैसे मागितले. जावयाने माझ्याकडे 20 लाखांची मागणी केली. तन्वीला सांगितलं की तुझ्या घरी तुझा हिस्सा माग. मी निवृत्त झाली आहे, मी पैसे देऊ शकली नाही. तेव्हापासून तिच्या सासरच्यांनी माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली”.

माहेरच्यांना उशिरा कळवण्यात आलं, तन्वीच्या वडिलांचा आरोप

“आम्हाला 10 वाजून 10 मिनिटांनी रुपनगर पोलीस ठाण्यातून फोन आला की तुमच्या मुलची प्रकृती गंभीर आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला उशिरा कळवण्यात आलं. तिला 8 वाजताच रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पूर्ण कुटुंबाने मिळून तिला मारहाण केली. तिला खाली पाडून मारहाण करण्यात आली. तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर मारहाणीचे वळ आहेत”, असं तन्वीचे वडील विशंभर यांनी सांगितलं.

2008 मध्ये लग्न

2008 मध्ये तन्वीचं लग्न अभिषेक नावाच्या व्यक्तीशी झालं. अभिषेक उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेच्या नरेला झोनमध्ये जेई आहे. हुंड्यासाठी तन्वीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप तन्वीच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

“नेहमी फोनवरुन तिच्याशी बोलणं व्हायचं. तन्वी तिच्या पतीबाबत सांगायची. तो तिला नेहमी त्रास द्यायचा. त्यांच्या नात्यात काहीही उरलं नव्हतं”, असं तन्वीच्या बहिणीने सांगितलं.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात उशिर केला, कुटुंबाचा आरोप

याप्रकरणी उत्तर दिल्ली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात उशिर केला, असा आरोप तन्वीच्या कुटुंबाने केला आहे.

तन्वी सध्या व्हेंटिलेटर आहे. मृत्यूशी तिची झुंज सुरु आहे. तन्वी कधी शुद्धीवर येणार याची प्रतिक्षा सध्या सर्व पाहत आहेत. तन्वीच्या कुटुंबातील अनेक जण मोठ्या पदांवर कार्यरत आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या कारवाईवर दबाव आणण्याचा प्रतत्न केला जात असल्याचीही माहिती आहे.

Delhi Dowry Case

संबंधित बातम्या :

Rape Case | “नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता ‘तो मी नव्हेचं’”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अटक नाहीच, नगरमध्ये तीव्र पडसाद

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें