AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

जवान संदीप पवार यांच्या हत्येमध्ये त्यांची पत्नी, भावजय आणि मेहुणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. Satara Army Murder wife

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 02, 2021 | 9:29 AM
Share

सातारा : सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जवानाच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच भावजय आणि मेहुण्याच्या साथीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती आहे. संदीप जयसिंग पवार यांचा अज्ञातांच्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. (Satara Army man Murder wife sister in law arrested)

साताऱ्यातील सैदापूर येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान संदीप जयसिंग पवार हे गावी सुट्टीवर आलो होते. 27 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन त्यांना जखमी केले, असा बनाव रचला होता. त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मारहाणीचा बनाव पत्नीकडून 

याबाबत त्यांच्या पत्नीनेच अज्ञात व्यक्तीविरोधात वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हा गुन्हा उघड करण्यासाठी सूचना केल्या.

त्यानुसार एलसीबी पथकाने सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन घरातील सदस्य, मयताचे नातेवाईक तसेच गावातील आजूबाजूचे लोक यांच्याकडे विचारपूस केली. चौकशी करताना घरातील कुटुंबीय काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला.

हत्येत पत्नीसह नातेवाईकही सहभागी

घरातील नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा जवान संदीप पवार यांच्या हत्येमध्ये त्यांची पत्नी, भावजय आणि मेहुणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मयत संदीप पवार हे सुट्टीवर आल्यावर दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करत, मारहाण करत वारंवार त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे.

त्रासाला कंटाळून 27 डिसेंबर रोजी सायंकाळी संदीप यांना घरात लाकडी कळकाच्या दांडक्याने मारहाण केल्याचे कुटुंबीयांनी कबूल केले. या गुन्हयातील आरोपींना अवघ्या चार तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कुशलतेने विचारपूस करुन क्लिष्ट अशा गुन्ह्याचा उलगडा सातारा पोलिसांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

पाणी पिण्याच्या बहाण्याने घर गाठलं, गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या, वर्ध्यात जवानाची आत्महत्या

नाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या

(Satara Army man Murder wife sister in law arrested)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...