AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात हत्यांचं सत्र सुरुच, कचरा वेचक तरुणाचा भररस्त्यात खून

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुंभारपुरा भागात एका युवकाचा खून करण्यात आला. मृत तरुण हा कचरा वेचक असून त्याला आरोपीने गट्टूनी मारले असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात हत्यांचं सत्र सुरुच, कचरा वेचक तरुणाचा भररस्त्यात खून
नागपुरात तरुणाची हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 05, 2021 | 7:55 AM
Share

नागपूर : नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून हत्यांचं सत्र सुरुच आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची घटना उघडकीस आली आहे. कचरा वेचक तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुंभारपुरा भागात एका युवकाचा खून करण्यात आला. मृत तरुण हा कचरा वेचक असून त्याला आरोपीने गट्टूनी मारले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

हत्येनंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. कचरा वेचक तरुणाची हत्या नेमकी कोणी आणि का केली, आरोपी कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

नागपूरच्या गुन्हेगारीची राष्ट्रीय स्तरावर ओळख

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकत नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळीवर सुरु केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे-मुंबई कितव्या स्थानी

नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात. गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनौ आणि दिल्लीसारख्या शहरांशी नागपूरची बरोबरी होत आहे. राज्यातील पुणे दहाव्या स्थानावर, तर मुंबई 16 व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे, की गुन्हेगारांचे? या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलिसांनी द्यायलाच हवे.

यूपी-बिहार-दिल्लीलाही मागे सोडले

नागपूर शहर गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. नागपूरकर जनतेसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी ही काही गौरवाची बाब नाही. मात्र आता नागपूरने गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील पाटणा, उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे आकडे समोर आल्याने गृहमंत्रालासह पोलिसांची चिंता देखील वाढली आहे.

नागपूर शहराच्या हद्दवाढीचा रेकॉर्डमध्ये विचार नाही

या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे नागपूर शहराची लोकसंख्या 25 लाख असल्याची नोंद आहे, मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरच्या अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे, त्यामुळे दर एक लाख लोकसंख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले, तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा यामध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते सांगतात.

नागपूरने यंदा पाटण्यालाही मागे टाकले

नागपुरात हत्या प्रकरणाचा दर 3.9 टक्के आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणांचा दर 3.9 टक्के एवढा असून हा देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.85 आहे. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणासंदर्भात नागपूरने यंदा पाटण्याला ही मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी यासंदर्भात नागपूरचे स्थान पाटण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी 2019 मध्ये नागपुरात हाच दर 3.6 टक्के होता, तर पाटण्यात तो 4.9 टक्के एवढा होता. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात पाटण्याची स्थिती सुधारली आहे तर नागपुरात स्थिती आणखी बिघडली आहे.

नागपूर शहरात वीस वर्षात 2022 खुनाच्या घटना झाल्या आहेत, त्यानुसार वर्षाकाठी शंभर खून होतात. ही संख्या वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र ही आकडेवारी आज वाढलेली नाही. नागपुरात वर्ष 2020 मध्ये हत्येची 97 प्रकरणं नोंदवली गेली होती. त्यामुळे आता याकडे लक्ष देऊन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

2016 मधील हत्याकांडातून पुराव्याअभावी सुटलेल्या गुंडाची नागपुरात हत्या

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..