नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त काही जणांनी दगडाने ठेचून गुंडाची हत्या केली आहे.

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

नागपूर : नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरलं आहे. शहरातील शांती नगर भागात ही घटना घडली (Nagpur Murder Case). मृत व्यक्ती हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची प्राथमिक माहीती आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत (Nagpur Murder Case).

रविवारी (7 फेब्रुवारी) काल रात्रीच्या सुमारास शांती नगरमधील नारायण पेठ येथे हत्येची घटना घडली. या घटनेने परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. विजय वागधरे असे मृतका चे नाव आहे. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे.

नेमकं काय झालं?

मृतक विजयचे काल दुपार पासून सुनील नावाच्या व्यक्तीसोबत भांडण सुरु होते. याची तक्रार देण्यासाठी सुनील पोलीस स्टेशनला गेला. मात्र, उपमुख्यमंत्री या परिसरात येणार असल्याने पोलीस बंदोबस्त तिकडे असल्याने पोलिसांनी विजयचा शोध घेतला नाही. रात्रीच्या सुमारास मृतक विजयने सुनीलच्या घरासमोर येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली.

गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त काही जणांनी दगडाने ठेचून गुंडाची हत्या केली आहे. मृतक विजय विरुद्ध गंभीर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो या भागातील आपल्या साथीदार सोबत हप्ता वसुली धंदे करायचा. अशाच अनेक तक्रारी त्याच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

याच परिसरात काल उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते यांचा कार्यक्रम होता. पोलिसांनी आतपर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. बाकी आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

Nagpur Murder Case

संबंधित बातम्या :

मुलीकडे एकटक बघणाऱ्या रोडरोमियोला सहा महिन्यांची सक्तमजुरी

बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि…

Published On - 9:52 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI