नागपुरात हुक्का पार्लरवर धाड, चार आरोपींना पोलिसांनी केली अटक

दोन हुक्का पार्लरवर एकाच दिवशी पोलिसांनी धाडी टाकल्या.

नागपुरात हुक्का पार्लरवर धाड, चार आरोपींना पोलिसांनी केली अटक
नागपुरात हुक्का पार्लरवर धाड
Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 28, 2022 | 2:24 PM

सुनील ढगे, Tv9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : नागपुरात अवैधरीत्या चालत असलेल्या हुक्का पार्लर (hookah parlor ) विरोधात पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केली. एकाच वेळी दोन हुक्का पार्लरवर धाड टाकत चार आरोपींना अटक (Accused Arrested) केली. कुठलीही परवानगी नसताना शहरांमध्ये अनेक ठिकाणी हुक्का पार्लर अवैधरित्या सुरू असल्याचा पुढे येत आहे. या नशेच्या आहारी युवा पिढी जात असताना पोलिसांनी यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.

दोन हुक्का पार्लरवर धाडी

नागपूरच्या पोलीस आयुक्त (Commissioner of Police) अमितेश कुमार यांनी अवैधरित्या चालणाऱ्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या दोन हुक्का पार्लरवर एकाच दिवशी पोलिसांनी धाडी टाकल्या.

हुक्का पार्लरमधील हुक्का पॉटसहित वेगवेगळे साहित्य जप्त केले. वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूजन्य फ्लेवर जप्त करण्यात आले. दोन्ही हुक्का पार्लर चालकांना आणि हुक्का बनवून देणाऱ्यांना अशा चार जणांना अटक केली.

पोलिसांना बघताचं मुलं पळाली

पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी या ठिकाणी मुलं आणि मुली हुक्का पित असल्याचं दिसून आलं. पोलिसांना बघताच मुलांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. शहरांतील अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे व्यापारी राहतात. काही श्रीमंतांच्या मुलांनी ही नशा केल्याचं दिसून आलं. हुक्का पार्लरच्या आहार युवा पिढी जात असल्याचं यातून स्पष्ट होते. यावर निर्बंध घालणं आवश्यक आहे.