अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 24, 2022 | 2:39 PM

Nashik Bus Accident : नाशिकच्या ( Nashik) मिर्ची हॉटेल चौफुलीवर खाजगी बस आणि ट्रकमध्ये (Bus-Truck Accidnet) झालेल्या अपघातात 12 जणांचा (Accident Death) होरपळून मृत्यू झाला होता. याशिवाय 31 प्रवासी जखमी झाले होते त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील होरपळून जखमी झालेले साहेबराव जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साहेबराव जाधव हे पन्नास वर्षांचे होते. नाशिकच्या औरंगाबाद रोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवर 8 तारखेला पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. चालकासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये मयत साहेबराव जाधव यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सुरुवातीला उपचार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते.

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

सुरुवातीला पहिल्याच दिवशी 12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, त्यात डीएनए चाचणी करून अनेक मयतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले होते.

बस अपघातानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी येऊन पाहणी केली होती, त्यावेळी राज्य सरकारनने मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.

याशिवाय प्रशासनाच्या सर्व विभागांची बैठक घेत, अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

बस अपघातानंतर बस आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, बस अपघाताची चौकशी आडगाव ठाण्याचे पोलीस करीत आहे.