मंगला एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 19, 2023 | 8:39 AM

तरुणीवर हल्ल्याची घटना ही मंगला एक्सप्रेसमध्ये घडली. वेंडर आणि तरुणाचा छोट्याशा कारणावरून वाद झाला. या वादात वेंडरने थेट धारदार शस्त्र काढले.

मंगला एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं?
Follow us on

नाशिक : नाशिकरोड रेल्वे (Nashik Railway) स्थानकात मंगला एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. किरकोळ कारणावरून वेंडरने एका तरुणीवर हल्ला (Attack on Young Girl) केला. त्यामुळे या तरुणीच्या पायाच्या भागावर गंभीर जखमा झाल्या. रेल्वे पोलिसांनी तरुणीला तातडीने नाशिकच्या (Nashik Crime) नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडताच रेल्वेतील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त केले.

तरुणीच्या पायावर दुखापत

तरुणीवर हल्ल्याची घटना ही मंगला एक्सप्रेसमध्ये घडली. वेंडर आणि तरुणाचा छोट्याशा कारणावरून वाद झाला. या वादात वेंडरने थेट धारदार शस्त्र काढले. या शस्त्राने वेंडरने तरुणीवर हल्ला केला. यात या तरुणीच्या पायावर गंभीर दुखापत झाली. ही बाब रेल्वे पोलिसांच्या लक्षात आली.

तरुणी बिटको रुग्णालयात दाखल

तरुणी जखमी झाल्यानंतर तिला चालता येत नव्हते. त्यामुळे नाशिक रेल्वे पोलिसांनी तरुणीला उचलले. तिला घेऊन रुग्णालयात दाखल केले. नाशिकरोड बिटको रुग्णालयात दाखल केले. तिथं या जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी वेंडरला ताब्यात घेतले.

नेमका वाद काय झाला?

वेंडरकडे शस्त्र कुठून आला. तो नेहमी सोबत ठेवत होता का. शिवाय छोट्याशा कारणावरून त्याने हल्ला का केला, याची चौकशी आता रेल्वे पोलीस करत आहेत. नेमका वाद काय झाला, हे तरुणी आणि वेंडर यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर रेल्वे पोलीस योग्य ती कारवाई करतील.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

तरुणीला वेंडरने शस्त्राने जखमी केले. त्यामुळे प्रवासी घाबरले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वेंडरपासून सावधान राहावे लागेल, अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

हल्लेखोराला अटक

वेंडर हा या प्रकरणातला हल्लेखोर आहे. रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आधी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वेंडरला ताब्यात घेतले. हल्ला करण्यामागचे कारण त्याला विचारण्यात येणार आहे.