AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधून दारूचा मोठा साठा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक नाशिकच्या सातपूर परिसरातून ताब्यात घेण्यात आला आहे. या ट्रकमधून मोठ्याप्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागच्या वतीने ही करावाई करण्यात आली.

नाशिकमधून दारूचा मोठा साठा जप्त; दोघांना घेतले ताब्यात
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 8:53 AM
Share

नाशिक – महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक नाशिकच्या सातपूर परिसरातून ताब्यात घेण्यात आला आहे. या ट्रकमधून मोठ्याप्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागच्या वतीने ही करावाई करण्यात आली. या ट्रकमधून तब्बल 200 दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. ट्रक आणि दारूसाठा मिळून जवळपास तीस लाखांचा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

दारू तस्करीच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. राज्यात बंदी असलेल्या दारूचा साठा घेऊन, एक ट्रक दादरा नगर हवेली येथून नाशिककडे येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रक पकडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ट्रॅप लावण्यात आला होता. अखेर या ट्रकला पकडण्यात यश आले आहे. ट्रकमधून दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या ट्रकमधून दारूचे तब्बल 200 बॉक्स जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. ट्रक आणि दारूसाठा मिळून जवळपास तीस लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दोघांना घेतले ताब्यात

दरम्यान या प्रकरणात वाहन चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूवर राज्यात बंदी असून, हा साठा कुठून आणला? दारूचा साठा नेमका कुठे नेण्यात येणार होता, याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची सेंच्यूरी नक्की, संजय राऊतांचा दावा; कंगना आणि विक्रम गोखलेंना जोरदार टोला

‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, कृषी कायद्यावरुन संजय राऊतांचा जोरदार टोला

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.