AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, कृषी कायद्यावरुन संजय राऊतांचा जोरदार टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केलीय. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय.

'चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ', कृषी कायद्यावरुन संजय राऊतांचा जोरदार टोला
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:52 AM
Share

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा काल केली. त्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातही सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींच्या कालच्या निर्णयाचं स्वागत करत, कृषी कायद्यावरुन त्यांना टोलेही लगावले आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केलीय. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. (MP Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over agriculture law)

माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.

‘कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो’

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात असल्याचं पाटील म्हणाले.

संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका

संजय राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

इतर बातम्या :

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, लखीमपूर हिंसा प्रकरणात विचारले तिखट सवाल

‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’, चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

MP Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over agriculture law

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.