AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची सेंच्यूरी नक्की, संजय राऊतांचा दावा; कंगना आणि विक्रम गोखलेंना जोरदार टोला

नाशिकमध्ये महापालिका निवडणूक आहे. 100 च्या खाली नगरसेवक देणार नाही असं इथले नेते सांगतात. जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस 10 नगरसेवकांचा मालक आहे. आपली सेन्च्यूरी नक्की आहे, असा विश्वास राऊत यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलाय.

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची सेंच्यूरी नक्की, संजय राऊतांचा दावा; कंगना आणि विक्रम गोखलेंना जोरदार टोला
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 12:43 PM
Share

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विजयाचा दावा केलाय. नाशिकमध्ये महापालिका निवडणूक आहे. 100 च्या खाली नगरसेवक देणार नाही असं इथले नेते सांगतात. जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस 10 नगरसेवकांचा मालक आहे. आपली सेन्च्यूरी नक्की आहे, असा विश्वास राऊत यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलाय. (Sanjay Raut claims that Shivsena will win in Nashik Municipal Corporation election)

नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेकांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे. या पेक्षाही मोठा कार्यक्रम झाला असता. पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. अमरावतीमध्ये काही झालं म्हणून नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली नाही. अमरावतीत जे झालं ते नाशिकमध्ये कधीच होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. इथे वॉर्डात मोदी उभे राहिले तरी डिजी तुन्ही जिंकून येणार, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

कंगना रनौत, विक्रम गोखलेंवर टीका

तसंच पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी जिंकला, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शेतकरी जिंकला म्हणून मलाही वाटतं की देशाला आज स्वातंत्र्य मिळालं. आज स्वातंत्र्य मिळालं असं फक्त कंगना किंवा विक्रम गोखले यांनाच वाटलं पाहिजे का? देशात आज चले जावं सारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केलीय.

चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला

कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली आहे. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

कृषी कायद्यावरुन भाजपव हल्लाबोल

राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

इतर बातम्या :

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, लखीमपूर हिंसा प्रकरणात विचारले तिखट सवाल

‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’, चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut claims that Shivsena will win in Nashik Municipal Corporation election

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.