पाडव्याला सोनं खरेदी करायचं असतं म्हणे, चोरट्यांनी लढवली शक्कल; सोन्याचं दुकानच…

गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला झालेली चोरीची घटना चर्चेचा विषय ठरत असून दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीवरुण गंगापुर रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाडव्याला सोनं खरेदी करायचं असतं म्हणे, चोरट्यांनी लढवली शक्कल; सोन्याचं दुकानच...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 23, 2023 | 7:50 AM

नाशिक : साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त पाडव्याला मानतात. त्यामुळे गुढी पाडव्याला अनेक जण सोनं खरेदी करतात. मात्र, हीच इच्छा पूर्ण करायची आहे पण पैसे नसल्याने ती इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती. नाशिक मधील चोरट्यांनी शक्कल लढवली आणि ती इच्छा पूर्ण केली आहे. चोरट्यांनी केलेलं काम पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या दुकानातून जवळपास 26 लाख रुपयांचे सोने चोरून नेले आहे. दुकान पाडव्याच्या पूर्व संध्येला बंद होते. त्याच दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत हाताला लागेल ते सोनं घेऊन लंपास झाले आहे.

नाशिकच्या गंगापुर रोड हा अत्यंत वर्दळीचा परिसर. याच परिसरातील सावरकर नगर परिसरातील टकले न्यू ज्वेलर्समध्ये ही चोरीची घटना घडली आहे. 20 ते 21 मार्च दरम्यान ही घटना घडली आहे. असून पाडव्याच्या पूर्व संध्येला ही बाब उघडकीस आली आहे. अपूर्व रघुराज‎ टकले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

20 ते 21 मार्च या दोन दिवसाच्या दरम्यान दुकान बंद असल्याचे पाहून दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या चोरीत तब्बल 25 लाख 75 हजार रुपयांचे विविध प्रकारचे सोने चोरीला गेले आहे.

परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असला तरी अद्याप चोरटे हाती लागलेले नाहीत. पाडव्याच्या मुहूर्तावर चोरट्यांनी केलेली हो चोरी चर्चेचा विषय ठरत असला तरी विविध प्रकारचे दागिने चोरट्यांनी चोरी करून नेमकं काय केलं याचा शोध पोलिस आता घेत आहे.

ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी कशी झाली ? याबाबत आता पोलिसांनाही संशय येऊ लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला चोरांनी चोरी करण्याची इतकी हिम्मत कशी केली ? याबाबत उलट सुलट चर्चा होत असून पोलिसांच्या कारवाई कडे लक्ष लागून आहे.