Nashik News : तहसिलदारांच्या घरी सापडली लाखो रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने

Nashik Crime News : नाशिकमध्ये काल रात्री एका लोकांना धक्का बसेल अशी घटना उघडकीस आली आहे. एका तहसिलदाराच्या घरी लाखो रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने सापडले आहेत.

Nashik News : तहसिलदारांच्या घरी सापडली लाखो रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने
NASHIK TALSILDAR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2023 | 12:55 PM

चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिक जिल्ह्यात (NASHIK NEWS) काल एका तहसिलदाराला एनसीबीच्या (TAHSILDAR ARRESTED) अधिकाऱ्यांनी १५ लाखांची लाज घेताना ताब्यात घेतलं आहे. त्या तहसिलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम (NARESHKUMAR BAHIRAM) असं आहे. काल रात्री एनसीबीच्या पथकाने तहसिलदारांच्या घराजवळ ही कारवाई केली. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तहसीलदारांनी लाच मागितली असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितली. ज्यावेळी तहसिलदारांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या ४ लाख ८० हजार रोकड आणि ४० तोळे सोने सापडले आहे. एनसीबीच्या पथकाने काल रात्री तहसिलदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी होणार असल्याची माहिती समजली आहे.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ काल रात्री अटक केली. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थानाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितली होती.

एसीबीच्या पथकाने रात्री उशिरा बहिरम यांना ताब्यात घेतल्यानंतर घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांना तहसिलदारांच्या घरी ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने आढळून आल्याची माहिती मिळाली पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. नरेश बहिरम यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज तहसिलदार बहिरम यांना न्यायालयात हजर केले जाईल.

तहसिलदारांना आज न्यायालयीन कोठडी मिळणार की एनसीबीच्या ताब्यात ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.