शेतकऱ्याने 20 गुंठ्यात फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर…

MAHARASHTRA NEWS : महाराष्ट्रात सध्या अनेक भाजेपाल्यांचे दर चांगलेचं वाढले आहेत. परंतु कोथिंबिरीचा दर घसरल्यामुळे सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

शेतकऱ्याने 20 गुंठ्यात फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर...
VEGETABLE RATEImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 10:59 AM

सांगली : देशात मागच्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर (TOMATO RATE) इतके वाढले आहेत की, सामान्य नागरिकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. त्याचबरोबर लसून सुध्दा मागच्या दोन दिवसांपासून २०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करीत असताना अधिक त्रास होत आहे. जोपर्यंत बाजारात भाजीपाल्याची (VEGETABLE RATE) आवक वाढत नाही. तोपर्यंत भाजीपाला स्वस्त होणार नाही असं व्यापारी सांगत आहे. कोंथिबिरीचे दर घसरल्यामुळे सांगलीतील एका शेतकऱ्याने शेतात टॅक्टर फिरवला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) चांगलाचं व्हायरल झाला आहे.

पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदील

सांगलीच्या बागणी येथील माळव्यासाठी प्रसिद्ध असणारे युवा शेतकरी शंकर गायकवाड यांनी त्यांच्या 20 गुंठे क्षेत्रावर केलेल्या कोथिंबिरीला दर नसल्याने रोटर फिरवला आहे. एका बाजूला टोमॅटोने गाठलेला दर आणि कोथिंबीरीचा पडलेला दर यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

कोथिंबिरीला पेंडीस 2 रूपये दराने विकली जात आहे

शंकर गायकवाड हे मागील 10 ते 12 वर्ष झाली माळवे क्षेत्रात आहेत. शंकर गायकवाड यांनी यापूर्वी कांदा, कोथिंबीर, मेथी, वांगी, मिरची, टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमावावर उत्पादन घेतले आहे. पण सध्या कोथिंबिरीला पेंडीस 2 रूपये दराने विकली जात आहे. औषधे, मशागत याचा खर्च जास्त झाला असल्याने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला. आपल्या कोंथिबीर शेतात त्या शेतकऱ्याने सरळ रोटर घातला आहे. एका बाजूला टोमॅटोने गाठलेला दर आणि कोथिंबीरीचा पडलेला दर यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

हे सुद्धा वाचा

काल बुलढाण्यात सुध्दा एका शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकली होती. त्याचे सुध्दा फोटो व्हायरल झाले होते.

Non Stop LIVE Update
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.