
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये कासना येथे निक्कीला जिवंत जाळलं. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. पतीसह सासरच्यांवर तिच्या हत्येचा आरोप आहे. या घटनेने हादरवून सोडलय. निक्कीचे नातेवाईक पती विपिन आणि सासरकडच्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत. या केसची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. आता या हत्याकांडात एक मिस्ट्री गर्लची एन्ट्री झाली आहे. चौकशीतून समोर आलय की, विपिन रात्रभर घराच्या बाहेर राहून डिस्कोला जायचा. दिवसा निक्कीसोबत घरी भांडणं करायचा.
रिपोर्ट्सनुसार विपिनच एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. विपिनचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात काही लोक त्याला मारहाण करताना दिसतायत. व्हिडिओत कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसतेय. हा व्हिडिओ मागच्यावर्षीचा असल्याच सांगण्यात येतय. निक्कीने विपिनला एक मुलीसोबत रंगेहाथ पकडलं होतं.
म्हणून निक्कीची माफी मागितलेली
निक्कीचे काका राजकुमार म्हणाले की, मागच्यावर्षी विपिनला निक्कीने एका मुलीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला. निक्की आणि विपिनमध्ये जोरदार भांडण झालं. मग विपिनने समाजात बदनामी होईल, म्हणून निक्कीची माफी मागितलेली. त्यानंतर प्रकरण शांत झालेलं. वाद मागच्यावर्षी झालेला. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे.
रात्रीचा डिस्कोमध्ये जायचा
निक्कीची बहिण कंचन म्हणाली की, विपिनचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध होते. रात्र-रात्र तो घराबाहेर असायचा. निक्कीने जाब विचारल्यानंतर तो तिला मारहाण करायचा. रिपोर्टनुसार ग्रामस्थांनी सांगितलं की, विपिन रात्रीचा डिस्कोमध्ये जायचा. काही काम करत नव्हता. इतक की, त्याने निक्कीला घर खर्चासाठी पैसे देणं सुद्धा बंद केलं होतं.
निक्कीच्या पार्लरमधून पैसे चोरायचा
निक्कीच्या नातेवाईकाने सांगितलं की, दीड वर्षांपूर्वी मी, निक्की आणि तिची बहिण कंचनच्या पार्लरमध्ये 8 लाख रुपये लावलेले. विपिन आणि त्याचा भाऊ काही काम करत नव्हते. दोन्ही बहिणी पार्लर चालवून स्वत:चा आणि मुलांचा खर्च उचलायची. निक्कीच्या वडिलांनी आरोप केला की, विपिन निक्कीच्या पार्लरमधून पैसे चोरायचा.