AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशी संतती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश करते, चाणक्य यांनी सांगितले वाईट मुलांची लक्षणं

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श मुलं कसे असावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात की जर एखादं मुलं चुकीच्या मार्गाने गेलं, त्याच्यावर योग्य संस्कार झाले नाहीत, तर तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो.

Chanakya Niti : अशी संतती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश करते, चाणक्य यांनी सांगितले वाईट मुलांची लक्षणं
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 8:01 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपल्या आयुष्यात प्रेरणा देतात. मानसाची कर्तव्य काय असतात? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? कुटुंब कसं असावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यासोबतच चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आदर्श संतती कशी असावी? आणि संतती चुकीच्या मार्गाने गेली तर कुटुंबाचा नाश कसा होतो, हे देखील सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी आदर्श संततीची नेमकी काय लक्षणं सांगितली आहेत, आणि जर एखादं मुल चुकीच्या मार्गावर गेलं तर तो आपल्या कुटुंबाचा कसा नाश करू शकतो? याबद्दल माहिती.

आदर्श संततीची लक्षणं – चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार होणं गरजेचं असतं. जर मुलांवर योग्य संस्कार झाले नाहीत. मुलं चुकीच्या संगतीला लागले तर ते फक्त एकट्या त्या संबंधित कुटुंबाचाच नाश करत नाहीत, तर संपूर्ण देशाचं देखील वाटोळ करत असतात. कारण तरुण हा कोणत्याही देशासाठी मोठी साधन संपत्ती असते. तरुणांच्या घामाच्या बळावरच कुठल्याही देशाचा विकास होत असतो. त्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच श्रमप्रतिष्ठेचे संस्कार झाले पाहिजेत. तसेच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळून देणं हे कोणत्याही आई-वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे. मुलगा जर सुशिक्षित असेल, तो आपल्या कुटुंबांचा व्यवस्थित सांभाळ करत असेल, आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेबाहेर नसेल तर अशा मुलांना आदर्श संतती म्हणावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे आपल्या चाणक्य नीति नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की जसं एखाद्या वाळलेल्या झाडाला जंगलात आग लागते, आणि त्यानंतर त्या आगीचं रूपांतर वणव्यात होऊन संपूर्ण जंगल जळून खाक होतं. तसंच मुलांच्या बाबतीमध्ये देखील होतं. जर तुमचं मुल वाईट मार्गाला लागलं. व्यसन करत असेल, जुगार खेळत असेल, मोठ्यांच्या आदर करत नसेल तर अशी संतती स्वत:सोबतच आपल्या कुटुंबांचा देखील नाश करते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित
फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब...
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...