AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचा ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर जबरदस्त डान्स; लेक रेवतीच्या संगीत समारंभातील व्हिडीओ चर्चेत

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेच्या संगीत समारंभातील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. 'लंडन ठुमकदा' या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचा 'लंडन ठुमकदा' गाण्यावर जबरदस्त डान्स; लेक रेवतीच्या संगीत समारंभातील व्हिडीओ चर्चेत
सुप्रिया सुळे यांचा डान्स व्हिडीओImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2026 | 3:17 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेचा नुकताच धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. रेवतीने प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानीशी लग्नगाठ बांधली. शनिवारी 20 जून 2026 रोजी मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. रेवती आणि सारंगच्या लग्नसोहळ्याचे, संगीत आणि मेहंदी समारंभाचे विविध फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा आहे. लेक रेवतीच्या संगीत समारंभात सुप्रिया सुळे यांनी ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर ठेका धरला होता. त्यांच्या या डान्सच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंग लखानी यांचं लग्न ठरल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी स्वत: अनेक पाहुण्यांना वैयक्तिक भेटून लग्नाची पत्रिका दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सुळे आणि पवार कुटुंबात रेवतीच्या लग्नाची मोठी धूम पहायला मिळाली. संगीत समारंभासाठी मोठा स्टेज बांधण्यात आला होता. यावेळी कुटुंबातील अनेक सदस्यांनी डान्स केला. सुप्रिया सुळेसुद्धा लेकीच्या संगीत समारंभात मनसोक्त नाचल्या.

सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा व्हिडीओ-

फक्त सुप्रिया सुळेच नाही तर रेवतीच्या भावंडांनीही स्टेजवर परफॉर्म केलं होतं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे देखील स्टेजवर नाचताना दिसले. जय पवार यांनी ‘सोनी दे नखरे’ या गाण्यावर डान्स केला, तर ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर युगेंद्र पवार परफॉर्म करताना दिसले. सोशल मीडियावर या दोघांचाही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रेवती सुळेच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. यावेळी रेवतीचे आजोबा शरद पवार हेसुद्धा व्हिलचेअरवरून पोहोचले होते.

रेवती सुळेनं नागपूरचे उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीशी लग्न केलं आहे. संगीत समारंभात बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘कोई मिल गया’ या गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी शाहरुखसोबत रेवतीसुद्धा थिरकली. लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन