AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेवती सुळेच्या संगीत समारंभात जय पवार यांचा खास डान्स; युगेंद्र पवार यांनीही धरला ठेका, पहा व्हिडीओ

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेचा अत्यंत थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे आणि त्यापूर्वीच्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये जय पवार थिरकताना दिसत आहेत.

रेवती सुळेच्या संगीत समारंभात जय पवार यांचा खास डान्स; युगेंद्र पवार यांनीही धरला ठेका, पहा व्हिडीओ
रेवती सुळेच्या संगीत समारंभात जय पवार यांचा डान्सImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2026 | 8:37 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली. शनिवारी 20 जून रोजी मुंबईत रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल इथल्या शानदार सभागृहात हा भव्य विवाहसोहळा पर पडला. या लग्न समारंभाला राजकीय, सामाजिक, उद्योग आणि कला क्षेत्रातील अनेक मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याचे त्यापूर्वीच्या मेहंदी, संगीत समारंभाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. कारण या व्हिडीओमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे स्टेजवर नाचताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये जय पवार हे स्टेजवर इतर काही जणांसोबत डान्स परफॉर्म करताना दिसत आहेत. ‘सोनी दे नखरे’ या गाण्यावर ते डान्स करत आहेत. त्यानंतर ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर युगेंद्र पवार परफॉर्म करताना दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रेवती सुळेच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. यावेळी रेवतीचे आजोबा शरद पवार हेसुद्धा व्हिलचेअरवरून पोहोचले होते.

पहा व्हिडीओ

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील रेवती सुळेच्या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुपुत्र पार्थ पवार यांचीही या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती होती.

रेवती सुळेनं नागपूरचे उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीशी लग्न केलं आहे. संगीत समारंभात बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘कोई मिल गया’ या गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी शाहरुखसोबत रेवतीसुद्धा थिरकली. लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. अमिताभ बच्चन हे पत्नी जया बच्चनसोबत या लग्नाला उपस्थित होते. तर भोजपुरी सेलिब्रिटी आणि खासदार रवी किशनसुद्धा पत्नीसोबत या लग्नाला पोहोचले होते.

Follow Us
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना