AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात बिग बींपासून रणबीर कपूरपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न 20 जून रोजी पार पडलं. या लग्नसोहळ्याला बच्चन कुटुंबीय, रणबीर कपूर, शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत.

सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात बिग बींपासून रणबीर कपूरपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी
अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2026 | 11:21 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेचा 20 जून 2026 रोजी लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि नामवंत राजकीय व्यक्तींची विशेष उपस्थिती पहायला मिळाली. फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी रेवतीच्या संगीत समारंभापासून ते लग्नसोहळ्यात रंगत आणली. अभिनेता शाहरुख खानच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रेवतीच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, रणबीर कपूर, रवी किशन, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांच्यासह अनेक उद्योगपतींनीही हजेरी लावली होती.

सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेनं नागपूरचे उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीशी लग्न केलं आहे. लग्नापूर्वी संगीत समारंभाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘कोई मिल गया’ या गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी शाहरुखसोबत रेवतीसुद्धा थिरकली. लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. अमिताभ बच्चन हे पत्नी जया बच्चनसोबत या लग्नाला उपस्थित होते. तर भोजपुरी सेलिब्रिटी आणि खासदार रवी किशनसुद्धा पत्नीसोबत या लग्नाला पोहोचले होते.

रेवती सुळेचा लग्नसोहळा जियो कन्वेन्शन सेंटरमध्ये पार पडला. संगीत समारंभात गायक राहुल वैद्यने परफॉर्म केलं होतं. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुखसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रेवती सुळेच्या लग्नाला आरएसएस प्रमुख मोहन भागवत, राहुल गांधी, अखिलेश यादव, भगवंत मान, पियुष गोयल, फारुख अब्दुल्ला आणि डीके शिवकुमार यांसारखे अनेक राजकारणीही उपस्थित होते.

दोन वेगळ्या राजकीय विचारसरणीचे घराणे एकत्र आल्यामुळे सुरुवातीला या लग्नाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र नंतर राजकीय भेद विसरून अनेकांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. रेवतीचे सासरे हे नागपूरमधील प्रसिद्ध उद्योजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले आणि भाजपचे उमेदवार अरुण लखानी आहेत. भारतातील राजकारणी हे वरकरणी जरी एकमेकांचे कट्टर विरोधक वाटत असले तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांचा संघर्ष रुपांतरित होतोच असं नाही. अनेकदा हे राजकारणी आणि त्यांचे कुटुंबीय पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकमेकांसोबतचे संबंध जपताना दिसतात.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप