AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Vastu Tips : किचनमधील ‘या’ 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी

Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वास्तूशास्त्रामध्ये किचनसंबंधी देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे... अशा काही 5 गोष्टी आहेत, ज्यावर दुर्लक्ष बिलकूल करु नका... जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी...

Kitchen Vastu Tips : किचनमधील 'या' 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी
| Updated on: Jun 22, 2026 | 3:17 PM
Share

Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. स्वयंपाकघर (Kitchen) घराचा महत्त्वाचा भाग आहे. याच कारणामुळे पंचभूतांवर आधारित वास्तूमध्ये स्वयंपाकघराबाबत विशेष नियम बनवण्यात आले आहेत. स्वयंपाकघर हे घराचा सर्वात पवित्र आणि शुभ भाग मानलं जातं. कारण त्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं. वास्तुशास्त्र आणि हिंदू श्रद्धेनुसार, देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. घरात समृद्धी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा साठा कधीही संपू देऊ नये. जर हा साठा संपणार असेल, तर तो त्वरित पुन्हा भरला पाहिजे.

मीठ : स्वयंपाकघरात मीठ कधीही कमी होऊ नये. मीठला राहू, केतू आणि शुक्र या ग्रहांशी थेट संबंधित मानलं जातं. स्वयंपाकघरात मिठाच्या कमतरतेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. वास्तूनुसार, मिठाच्या कमतरतेमुळे वास्तू दोष वाढू शकतात आणि घरात धन-संपत्तीची कमतरता देखील निर्माण होऊ शकते.

हळद : हळद केवळ एक मसाला नाही, तर ती अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला जातो. गुरू ग्रह हा भाग्य, समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह मानला जातो. स्वयंपाकघरात हळदीच्या कमतरतेमुळे गुरु दोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे शुभ कार्यांमध्ये अडथळे येतात आणि धनहानी होऊ शकते.

तांदूळ : शास्त्रांमध्ये तांदळाला अक्षत म्हटले आहे. याचा अर्थ, जे कधीही सडत नाही किंवा नष्ट होत नाही. तांदळाचा संबंध शुक्र ग्रह आणि संपत्तीची देवी, लक्ष्मीजी यांच्याशी जोडला जातो. स्वयंपाकघरातील भांड्यातील पूर्णपणे रिकामे तांदूळ हे घरात समृद्धी आणि भौतिक सुखसोयींचा अभाव असल्याचे सूचित करतात. यामुळे शुक्र ग्रह कमजोर होऊ शकतो आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

पीठ : पीठ हे घरातील मुख्य अन्न आहे. पीठ हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानलं जातं. पीठ संपल्याने प्रतिष्ठेवर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मोहरीचे तेल : स्वयंपाकात वापरले जाणारे मोहरीचं तेलही खूप महत्त्वाचं आहे. मोहरीचे तेल हे न्यायाचे देव शनिदेवांशी संबंधित आहे. स्वयंपाकघरातील मोहरीचं तेल अचानक संपल्यास शनिदेवांचा कोप किंवा शनिदोष होऊ शकतो. यामुळे घरातील सदस्यांच्या कामात अडथळे येऊ शकतात आणि अनावश्यक खर्च होऊ शकतो.

विशेष वास्तु टिप्स

जेव्हा या पाच वस्तू संपतील, तेव्हा त्या नवीन वस्तूंनी भरा. मीठ, हळद आणि तांदूळ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेला अन्नपूर्णा देवीचं छोटं चित्र किंवा मूर्ती ठेवायला विसरू नका. यामुळे घरात अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?