CCTV : संतोष आणि हेमंत एकमेकांचे यार, पण हेमंतने चक्क कटरने संतोषचा का चिरला गळा?

| Updated on: Oct 24, 2022 | 10:51 AM

परभणीतील भरदिवसा घडलेला हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद! मित्राने मित्राचा का घेतला जीव?

CCTV : संतोष आणि हेमंत एकमेकांचे यार, पण हेमंतने चक्क कटरने संतोषचा का चिरला गळा?
भरदिवसा थरारक हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

परभणी : परभणीमध्ये भरदिवसा चारचौघात एका मित्राने मित्राचा खून (Parbhani Murder) केला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV Crime) कॅमेऱ्यात कैद झालीय. परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील चौकामध्ये घडलेल्या हत्येच्या घडनेनं एकच खळबळ माजलीय. आर्थिक वादातून मित्राने चक्क कटरच मित्राच्या गळ्यावरुन भिरवला. यात गंभीर जखमी झालेला व्यक्ती मृत्यूशी झुंज देत होता. पण उपचादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Police Arrest) केलीय. पुढील तपास केला जातो आहे.

हेमंत गंडले आणि त्याचा मित्र संतोष आवटे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की हेमंत यांने भररस्त्यात चक्क कटरने संतोष आवटे यांचा गळा चिरला.  रस्त्यामध्येच रहदारी दरम्यानच घडलेल्या या थरारक हत्याकांडाच्या घटनेनंतर आरोपी हेमंत जणू काही घडलंच नाही, अशा प्रकारे घटनास्थळवरुन निघून गेला.

पाहा लाईव्ह घडामोडी :

परभणीच्या सेलू शहरात भर दिवसा घडलेली ही हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी हेमंत याचा शोध घेतला. त्याला अटकही केली. आरोपी हेमंतच्या चौकशीहून आर्थिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं समोर आलंय. आरोपी हेमंत गंडले याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये हेमंत आणि संतोष यांच्यात चर्चा असल्याचं दिसून आलं आहे. चर्चेदरम्यान संतोष आवटे हा हेमंत गंडले यांना काहीतरी सांगत असल्याचं दिसून आलं आहे. हेमंत गंडले संतोषला जाब विचारत होता. एका रिक्षा शेजारी दोघे उभे राहून बोलत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलंय. याच चर्चेवेळी एका क्षणी संताप अनावर होऊन हेमंत खिशातून कटर काढतो आणि संतोषच्या गळ्यावरुन फिरवतो.

गळ्यावरुन कटरने वार केल्यानंतर संतोषला काही काळ काय झालंय हे कळत नाही. त्याच्या गळ्याला जखम झालेली असते. पण तो शुद्धीत असतो. हेमंत तिथून निघून जातो. आणि संतोषही गळ्यावर हात ठेवून दुसऱ्या दिशेने जातो. पण आपल्याला झालेली गळ्यावरची जखम गंभीर आहे, हे संतोषच्या लक्षात येतं.

रक्तबंबाळ अवस्थेत संतोष याला सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येतं. पण तिथे उपचारादरम्यान संतोष यांचा मृत्यू होतो. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपील हेमंत याला अटक केलीय. संपूर्ण परभणी जिल्ह्यात या घटनेनं खळबळ उडाली होती.