मराठवाडा विभागातील केवळ तीन जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे ते ही तुरळक ठिकाणी. राज्यात इतरत्र मान्सून सक्रीय होत असला तरी या विभागातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याचा काही भाग यामध्ये अजून पावसाचे आगमनही झाले नाही.
यंदा एका प्रभागात तीन नगरसेवक अश्या पद्धतीने प्रभाग रचना राहणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून त्याप्रकारची प्रभागांची रचना या वेळी तयार करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत महापालिकेकडून मोठे बदल करण्यात आलेत. मात्र, झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय समीकरण बदलले, तर काहींचे प्रभाग गायबच झालेत.
पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी डावलल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ताई नाही तर भाजपा नाही... अशा आशायाचे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.
गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे तर आता पावसालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कारखाने नाईलाजास्तव का होईना बंद करावेच लागणार आहेत. गेल्या 6 महिन्यात जिल्हाभरातील 6 साखर कारखान्याने तब्बल 40 लाख मेट्रि�
शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप गुट्टे यांच्यावर लावण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील महिलेने गंगाखेड पोलिसांत गुट्टे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
परभणी बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड झाली आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे हे उन्हाळी पीकही बहरात होते. अंतिम टप्प्यात मात्र, वाढत्या उन्हामुळे शेंगा पोसल्या नसल्या तरी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे भुईमूग शेंगाची खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होत�
परभणी शहरातील दर्गा रोड येथील ही घटना आहे. विषबाधा झालेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
मोठ्या संख्येने वराडी, वधू-वर यांचे नातेवाईक उपस्थित होते. या विवाहसोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे परभणीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड झाला आहे.