AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा-ओबीसी आरक्षण ठाकरे-पवार यांचे पांढऱ्या पायच्या सरकारने घालवले; भाजपच्या मराठवाड्यातील नेत्याचे अजब विधान

BJP Leader Statement : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. पण हे सरकार पांढऱ्या पायचे होते. त्यांच्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण गेल्याचा अजब दावा मराठवाड्यातील भाजप नेत्याने केला आहे.

मराठा-ओबीसी आरक्षण ठाकरे-पवार यांचे पांढऱ्या पायच्या सरकारने घालवले; भाजपच्या मराठवाड्यातील नेत्याचे अजब विधान
हे तर पांढऱ्या पायाचे सरकार, आरक्षण घालवले
| Edited By: | Updated on: Jun 16, 2024 | 2:56 PM
Share

कोणतेही नवीन सरकार आले की ते कायम मागील सरकारला दुषणं देत राहते. सर्वच खापर जुन्या सरकारवर फोडून धन्यता मानण्यात येते. मराठवाड्यातील भाजप नेत्याचे विधान सध्या यामुळेच चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण गेल्याचा अजब दावा त्यांनी केला. हे आरक्षण घालविण्यासाठी महाविकास आघाडीच कारणीभूत असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे आता जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

पांढऱ्या पायाच्या सरकारने आरक्षण घालवलं

भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीवर कोरडे ओढले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले, असा दावा लोणीकर यांनी केला. ओबीसी आरक्षण सुद्धा याच पांढऱ्या पायाच्या आघाडी सरकार मुळे गेल्याचे ते म्हणाले. परभणी दौऱ्यावर असताना बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले. त्यांच्या विधानाची एकच चर्चा रंगली आहे.

चाळीस वर्षांत काय केलं?

बबनराव लोणीकर यांनी मराठा आरक्षणावरुन काँग्रेसला धारेवर धरले. त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. चाळीस वर्ष राज्यात मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षणावर चर्चा सुद्धा झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. मात्र आमच्या सरकारमध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं, असे लोणीकर म्हणाले.

त्यामुळे लोकसभेत पराभव

यंदाची लोकसभा निवडणूक विकासावर न होता जातीपातीच्या मुद्द्यावर लढवली गेली. अपप्रचारामुळे मराठवाड्यात आमचा पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला. या अपप्रचारामुळेच मराठवाड्यात एकही जागा न आल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाड्यात एकच जागा महायुतीच्या गळाला लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे सेनेने एका जागेची कमाई केली.

देव आणि देवेंद्राला ठाऊक

संभावित मंत्रिमंडळ विस्तार मध्ये माझा समावेश असेल की नाही हे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.मात्र मी आशावादी माणूस आहे मी चांगलं काम केलं मला संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात लोणीकर यांना लॉटरी लागू शकते, अशी चर्चा रंगली आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.