Nitesh Rane : हिंदू समाजाविरोधात जे मस्ती करतील ते दोन पायावर…नितेश राणे यांची थेट वॉर्निंग
Nitesh Rane : दिवाळी दरम्यान फटाके फोडण्यावरून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात हाणामारी झाली होती. त्यात मारुती डुकरे यांचा मृत्यू झाला होता.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथे फटाके फोडण्यावरुन दोन गटात वाद झाला होता. यामध्ये मारुती डुकरे यांचा मृत्यू झाला होता. आज भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी रोहिला पिंपरी येथे जाऊन डुकरे कुटुंबीयांची भेट घेतली. ही सांत्वन पर भेट होती. त्यांनी डुकरे कुटुंबियांचं सांत्वन केलं. नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मुस्लिम समाजाला टार्गेट केलं. “हिंदू समाजाविरोधात जे मस्ती करतील ते दोन पायावर घरी जाणार नाहीत. एवढी काळजी आमचे सरकार घेईल” असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी थेट मुस्लिम समाजाला टार्गेट केलं.
दिवाळी दरम्यान फटाके फोडण्यावरून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात हाणामारी झाली होती. त्यात मारुती डुकरे यांचा मृत्यू झाला होता. अधिवेशन सुरू असल्याने सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन मंत्री नितेश राणे यांना थेट पीडिताच्या घरी भेटण्यासाठी पाठवले होते. मंत्री नितेश राणे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि “हे महायुतीचे सरकार हिंदू धर्मीयांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, याची काळजी घेणारे हे सरकार आहे” असं म्हटलं.
मुस्लिम बांधवांना इशारा
“जो कोणी जादा मस्ती करेल, तो दोन पायावर आपल्या घरी जाणार नाही. याची काळजी या सरकारचे पोलीस खाते घेईल असे म्हणत” नितेश राणे यांनी थेट मुस्लिम बांधवांना इशारा दिला आहे. नितेश राणे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी आतापर्यंत अनेकदा अशी रोखठोक भूमिका घेतली आहे.
तीन निर्णायक निर्णय घेण्यात आले
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानसभेमध्ये तीन निर्णायक निर्णय घेण्यात आले. इलेक्ट्रिक गाड्यांना टोल माफी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड एमआयडीसीमध्ये एका कामगाराला अपघात झाला होता, तो प्रश्न विचारण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील विक्रांत वाईन आणि बजाज वाईन यांची लायसन रद्द करण्यात आली.
