AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅसचा तुटवडा संपणार! राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून…महत्त्वाची अपडेट काय?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर राज्यातील गॅस सिलेंडर टंचाईबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आता ते नेमकं काय झालं जाणून घ्या...

गॅसचा तुटवडा संपणार! राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून...महत्त्वाची अपडेट काय?
छगन भुजबळImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 5:18 PM
Share

गेल्या पंधरा दिवसांपासून इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिका एकवटले आहेत. दोन्ही देश मिळून इराणवर प्राणघातक हल्ले करताना दिसत आहेत. इराण देखील दोन्ही देशांना सडेतोड उत्तर देत आहे. मात्र, या युद्धामुळे जगात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतापुढेही इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात एलएनजी आणि LPGची टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा पसरवल्या जात असल्याचे मंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर राज्यातील गॅस सिलेंडर टंचाईबाबत वक्तव्य केले आहे. “आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने मी जनतेला करत आहे” असे छगन भुजबळ म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९,००० मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे.”

शेवटी ते म्हणाले, गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअ‍ॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Follow Us
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत