AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणाऱ्या खेळाडूची चर्चा

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पुढच्या फेरीसाठी आता चुरस पाहायला मिळत आहे. 48 संघापैकी 32 संघांची पुढच्या फेरीत वर्णी लागणार आहे. असं असताना जर्मनीने ई गटातून पुढच्या फेरीत एन्ट्री झाली आहे. जर्मनीने आयवरी कोस्टला 2-1 ने मात देऊन पुढच्या फेरीत स्थान मिळवलं आहे.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणाऱ्या खेळाडूची चर्चा
FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणारा खेळाडूची चर्चाImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 21, 2026 | 4:12 PM
Share

Germany vs Ivory Coast: टोरंटो स्टेडियममध्ये जर्मनी आणि आयवरी कोस्ट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला 2-1 ने मात दिली. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ई गटात दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला लोळवलं आणि राउंड ऑफ 32 म्हणजेच बाद फेरीत एन्ट्री मारली आहे. जर्मनी आधी यजमान अमेरिका आणि मेक्सिकोने बाद फेरीत स्थान पक्कं केलं आहे. जर्मनी फिफा वर्ल्डकप 2018 आणि 2022 मध्ये बाद फेरीपूर्वीच अपयशी ठरला होता. मात्र यावेळी जर्मनी चांगली कामगिरी केली आणि बाद फेरीत स्थान पक्कं केलं.

जर्मनीला पुढच्या फेरीचं तिकीट कसं काय?

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जर्मनीने पहिल्या सामन्यात कुरासाओला 7-1 पराभूत केलं होतं. तसेच खात्यात 3 गुण पडले होते. तसेच गोल डिफरन्सही अधिक होता. त्यानंतर आयवरी कोस्टला 2-1 ने मात दिली. त्यामुळे 6 गुण पदारात पडले. दुसरीकडे जर्मनीच्या विजयानंतर या गटातील इक्वाडोर आणि कुरासाओ यांच्यात लढत झाली. पण हा सामना 0-0 ने ड्र झाला. या ड्रॉमुळे इक्वाडोरचे 2 सामने खेळून फक्त 2 गुण झाले. तर आयव्हरी कोस्टचे 3 गुण झाले आहेत. आयव्हरी कोस्टला पुढच्या फेरीचं तिकीट मिळण्याची सर्वाधिक संधी आहे. शेवटचा साना कुरासाओविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास 6 गुण होतील. इतकंच काय ड्रॉ झाला तर 4 गुण होतील. त्यामुळे थेट किंवा सर्वोत्तम तिसरा संघ म्हऊन संधी मिळू शकते.

डेनिज उनडव जर्मनीचा हुकूमाचा एक्का

जर्मनीला बाद फेरीचं तिकीट मिळवून देण्यात एका खेळाडूचं योगदान महत्त्वाचं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डेनिज उनडव आहे. हा खेळाडू स्टार्टिग इलेव्हनचा भागही नाही. पण जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या नाकी नऊ आणतो. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात जर्मनीसाटी आतापर्यंत 11 सामन्यात 432 मिनिटात 9 गोल मारले आहेत. त्याचा हा विक्रम भले 11 सामन्यात झाला असेल. पण त्याने मैदानावर 5 सामन्यांपेक्षा कमी अवधी घालवला आहे. आयव्हरी कोस्ट सामन्यातही असंच घडलं. आयव्हरी कोस्टने 30 व्या मिनिटाला गोल मारला. त्यामुळे जर्मनी 1-0 ने अडचणीत होता. पण डेनिज उनडव मैदानात उतरला आणि चित्र पालटलं.

या सामन्यातील 60 व्या मिनिटाला डेनिज उनडवने एन्ट्री मारली आणि 65व्या मिनिटाला पिहला गोल मारत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर 90 मिनिटानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये त्याने दुसरा गोल मारला आणि संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. या दोन गोलमुळे जर्मनीची पुढच्या फेरीची वाट मोकळी झाली. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...