AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

| Updated on: Jun 21, 2026 | 11:11 AM
Share

नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे जवळगावकर पुन्हा चर्चेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत आपणही भाजपमध्ये प्रवेश केला असता, तर आज आमदार झालो असतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्या या विधानामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

माधवराव पाटील जवळगावकर यांनी अद्याप भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, येत्या काळात ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 21, 2026 11:11 AM

Follow Us