मुझफ्फरनगरमध्ये 17 शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| Updated on: Dec 08, 2021 | 11:30 PM

18 नोव्हेंबर रोजी जीजीएस इंटरनॅशनल अॅकॅडमी स्कूलमध्ये 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत थांबवण्यात आले होते. तेथेच त्यांना जेवणातून नशेचे पदार्थ देण्यात आले. त्यानंतर आरोपी शिक्षकाने त्यांचा विनयभंग केला.

मुझफ्फरनगरमध्ये 17 शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
minor girl
Follow us on

मुझफ्फरपूर : विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याप्रकरणी यूपीच्या मुझफ्फरनगरमधील एका शालेय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर नराधम शिक्षक पुरकाजी पोलीस ठाणे हद्दीतील तुघलपूर कमहेरा गावातील शाळेत शिकवतो. विद्यार्थ्यांनींना नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत तो अश्लीलतेची सीमा ओलांडायचा. योगेश असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

विद्यार्थीनीच्या जबाबावरुन शिक्षकाला बेड्या

मंगळवारी दोन विद्यार्थिनींना पोलिसांच्या वतीने न्यायालयात हजर करण्यात आले. यापैकी एका विद्यार्थीनीचा जबाब नोंदवण्यात आला. त्याआधारे ही केस अधिक मजबूत झाली आणि त्यानंतर आरोपी शिक्षकालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उशिरा योगेशला अटक करून न्यायालयात हजर केले. तेथून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून आरोपी सध्या कारागृहात आहे.

पोलिसांच्या तपासात निष्काळजीपणा

याप्रकरणी प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 17 हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून झालेल्या सामूहिक अश्लीलतेचे हे खळबळजनक प्रकरण गेल्या 5 दिवसांपासून दडपण्यात पुरकाजी पोलीस गुंतले होते, अशी तक्रार गेल्या 5 दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र दोन्ही कुटुंबांनी थेट एसएसपींकडे तक्रार केल्याने पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आला आणि प्रकरणाचा तपास पुढे जाऊ शकला. याप्रकरणी पुरकजीचे निरीक्षक विनोद कुमार यांनाही निष्काळजीपणासाठी तंबी देण्यात आली आहे.

काय घडले नेमके?

18 नोव्हेंबर रोजी जीजीएस इंटरनॅशनल अॅकॅडमी स्कूलमध्ये 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत थांबवण्यात आले होते. तेथेच त्यांना जेवणातून नशेचे पदार्थ देण्यात आले. त्यानंतर आरोपी शिक्षकाने त्यांचा विनयभंग केला. काही विद्यार्थिनींनी शिक्षकाचा पर्दाफाश करण्याबाबत बोलले असता, त्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकीही देण्यात आली. मात्र दोन विद्यार्थिनींनी धाडस दाखवत संपूर्ण प्रकरण घरच्यांना सांगितले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली आणि आता आरोपी शिक्षकाचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. (Police arrest teacher for molesting 17 schoolgirls in muzaffarpur)

इतर बातम्या

व्हेल माशाची एक कोटीची उलटी पिंपरी पोलिसांकडून जप्त, दोन आरोपी अटकेत

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?