गर्भलिंग तपासणीचं कोल्हापूर हब? गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये दररोज नवे खुलासे; आज काय ?

| Updated on: Jan 23, 2023 | 8:34 AM

करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड आणि हातकणंगले या तालुक्यांमध्ये कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली असून यातील मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 12 जणांना बेड्या ठोकल्या आहे.

गर्भलिंग तपासणीचं कोल्हापूर हब? गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये दररोज नवे खुलासे; आज काय ?
Image Credit source: Google
Follow us on

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये मंगळवारी म्हणजेच 17 जानेवारीला बोगस डॉक्टरांकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली होती. मात्र, या गर्भलिंग निदान चाचणीच्या रॅकेटची व्याप्ती वाढत चालली असल्याचे पोलीसांच्या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड आणि हातकणंगले या पाच तालुक्यात हे रॅकेट सुरू असल्याचे आत्तापर्यंतच्या कारवाईत समोर आल्यानं कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे. यामध्ये कोल्हापूर पोलीसांनी चार दिवसांत 12 जणांच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढत चालल्याने बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी रॅकेटची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. एजंटसह काही डॉक्टर आणि त्यांच्या मदतनीस असलेल्या व्यक्तींनाही यामध्ये ताब्यात घेण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

17 जानेवारीला श्रीमंत पाटील, मदतनीस दत्तात्रय पाटील आणि सुनील ढेरे या तिघांना चाचणी करतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या कारवाई 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून दोन डॉक्टर आणि एका एजंटला पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या व्यक्तीलाही पोलीसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड आणि हातकणंगले या तालुक्यांमध्ये कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली असून यातील मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 12 जणांना बेड्या ठोकल्या आहे.

आत्तापर्यंत झालेल्या कारवाईत तीन डॉक्टरांचाही समावेश आहे. अमोल सुर्वे एजंटला हातकणंगले तालुक्याती रुई मधून अटक करण्यात आली आहे. तर डॉ. ज्ञानदेव दळवी आणि डॉ. उमेश पवार हे दोघेही पोलीसांच्या तपासात सापडले आहे.

पोलिसांबरोबर या कारवाई आरोग्य पथकाचा देखील समावेश आहे. कारवाई दरम्यान कार, सोनोग्राफी मशीन, गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या आहे. पोलिसांचा तपास सुरू असून प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.