VIDEO | छापा टाकायला गेलेले पोलीसांनी घरात करत होते चोरी ? महिलांनी तपासणीच्या नावाखाली पॅन्ट काढायला लावली

| Updated on: Jan 26, 2023 | 9:49 AM

VIDEO | छापा टाकायला गेलेल्या पोलिसांची महिलांनी घेतली झडती, तपासणी दरम्यान पोलिसांना पॅन्ट उतरवायला लावली, मग...

VIDEO | छापा टाकायला गेलेले पोलीसांनी घरात करत होते चोरी ? महिलांनी तपासणीच्या नावाखाली पॅन्ट काढायला लावली
bihar crime news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

बिहार : बिहार (Bihar) राज्याची राजधानी पटना (patna) येथील बिहटा पोलिस स्टेशनच्या (Bihta Police) परिसरातील बांटा मुसहरीमध्ये एका ठिकाणी अवैद्य दारु विक्री होत असल्याची पोलिसांना सुचना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली, तिथं चौकशी करीत असताना पोलिसांच्यावर महिलांची चोरीचा आरोप केला. महिला आक्रमक झाल्यानंतर पुढे काय झालंय हे सगळं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

छापेमारी करण्यासाठी गेलेली पोलिस महिलांच्या कचाट्यात चांगलीच सापडली होती. विशेष म्हणजे सुरुवातीला महिलांनी पोलिसांना घेरलं. त्यानंतर पोलिसांवर चोरीचा आरोप केला. त्याचबरोबर महिलांनी पोलिसांची झडती घेतली. त्यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याला पॅन्ट काढायला लावली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.

बिहटा स्टेशनचे पोलिस निरीक्षक सनोवर खान यांनी सांगितले, की बांटा मुसहरी परिसरात एक पोलिस कर्मचारी तिथं छापेमारी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथल्या ग्रामीण महिला आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाला. ग्रामीण महिला त्या पोलिस कर्मचाऱ्याने चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी चौकशी आदेश दिले आहेत. जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याला शिक्षा होईल.