माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक, 15 मेपर्यंत पोलीस कोठडी, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: May 12, 2021 | 11:15 AM

केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी विधानपरिषदेचे माजी आमदार प्राभकर घार्गे यांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. Prabhakar Gharge Jaideep Thorat Death Case

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक, 15 मेपर्यंत पोलीस कोठडी, नेमकं प्रकरण काय?
प्रभाकर घार्गे, माजी आमदार
Follow us on

सातारा: जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्या मारहाणीतनंतर त्यांचा मृत्यू होता. केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी विधानपरिषदेचे माजी आमदार प्राभकर घार्गे यांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रभाकर घार्गे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी प्रभाकर घार्गे यांच्यासह 20 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले होते. ( Prabhakar Gharge ex MLC member arrested in Chemist officer Jaideep Thorat Death Case)

प्रभाकर घार्गे यांना अटक

के.एम अॅग्रो प्रोसेसिंग लि.पडळ साखर कारखान्यातील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीत दोन महिन्यापुर्वी झाला होता मृत्यू झाला होता. या मारहाण या प्रकरणी वडुज पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 संशयितांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रभाकर घार्गे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रभाकर घार्गे कोण आहेत?

प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत. खटाव माण साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला 10 मार्च 2021 कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांना 11 मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

को चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह सहा जणांना अटक

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आलीहोती. मात्र, नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर त्यांचे जवाब घेऊन कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, मुख्यकार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत वडुज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज घोरपडे यांच्यासह 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे

संबंधित बातम्या:

साखर कारखान्यातील अधिकाऱ्याला इतकं मारलं की त्याचा जीव गेला, राष्ट्रवादीचे माजी आमदार अडचणीत येणार?

Video | व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळेंचं नशीब पालटलं, थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

(Prabhakar Gharge ex MLC member arrested in Chemist officer Jaideep Thorat Death Case)