साखर कारखान्यातील अधिकाऱ्याला इतकं मारलं की त्याचा जीव गेला, राष्ट्रवादीचे माजी आमदार अडचणीत येणार?

सातारा जिल्ह्यात पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे (Sugar Factory officer lost his life after beating by seniors of factory in Satara).

साखर कारखान्यातील अधिकाऱ्याला इतकं मारलं की त्याचा जीव गेला, राष्ट्रवादीचे माजी आमदार अडचणीत येणार?
साखर कारखाना

सातारा : सातारा जिल्ह्यात पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे (Sugar Factory officer lost his life after beating by seniors of factory in Satara). साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी माजी आमदारासह 19 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचं देखील नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला 10 मार्चला कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांना 11 मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जगदीप थोरात यांचा उपचारानंतर मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण करणार्‍या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कार केले.

को चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह सहा जणांना अटक

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मात्र, नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर त्यांचे जवाब घेऊन कारखाण्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, मुख्यकार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील को. चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे (Sugar Factory officer lost his life after beating by seniors of factory in Satara).

हेही वाचा : Video | व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळेंचं नशीब पालटलं, थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

Published On - 5:33 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI