Tanushree Dutta | ‘आशिक बनाया आपने’वर तनुश्री दत्ताचा दमदार डान्स, मनोरंजन विश्वात पुन्हा धमाका करण्यास तयार, पाहा Video

Tanushree Dutta | ‘आशिक बनाया आपने’वर तनुश्री दत्ताचा दमदार डान्स, मनोरंजन विश्वात पुन्हा धमाका करण्यास तयार, पाहा Video
तनुश्री दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचे नाव जेव्हा जेव्हा चर्चेत येते, तेव्हा तिचे 'आशिक बनाया आपने' (आशिक बनाया आपसे) हे गाणे सगळ्यांच्याच ओठांवर तरळते. या गाण्यात तनुश्री दत्ताच्या पर्फोर्मंसने सर्वांनाच मोहित केले होते.

Harshada Bhirvandekar

|

Mar 12, 2021 | 5:33 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचे नाव जेव्हा जेव्हा चर्चेत येते, तेव्हा तिचे ‘आशिक बनाया आपने’ (आशिक बनाया आपसे) हे गाणे सगळ्यांच्याच ओठांवर तरळते. या गाण्यात तनुश्री दत्ताच्या पर्फोर्मंसने सर्वांनाच मोहित केले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ता बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. पण, आता ती पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. यासाठी तनुश्रीने स्वतःमध्ये काही कमालीचे बदल घडवून आणले आहेत. तिच्यातील हे बदल नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत (Aashiq Banaya Aapne Fame Tanushree Dutta share bold video on social media).

तनुश्री दत्ता सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्यातील परिवर्तन पाहिल्यानंतर तनुश्री दत्ता तिच्या कमबॅकसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे.

पुन्हा एकदा ‘आशिक बनाया…’

पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने ‘आशिक बनाया आपने’ या स्वतःच्या गाण्यावर व्हिडीओ बनवून आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत तनुश्रीचे वजन खूप जास्त वाढले होते, पण आता तिचा हा लूक बघता तिने स्वतःवर घेतलेली मेहनत लक्षात येत आहे. तिने स्वत:ला खूप बदलले आहे आणि ती पुन्हा एकदा पहिल्यासारखी स्लीमट्रीम झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला जुन्या ‘आशिक बनाया आपने’ मधील तनुश्री दत्ताची नक्की आठवण येईल. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘आशिक बनाया आपने’ हे गाणे वाजत आहे आणि तनुश्री दत्त त्यावर नृत्य करत आहे (Aashiq Banaya Aapne Fame Tanushree Dutta share bold video on social media).

पाहा तनुश्रीचा व्हिडीओ :

(Aashiq Banaya Aapne Fame Tanushree Dutta share bold video on social media)

हा व्हिडीओ स्वतः तनुश्री दत्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात ती पार्टीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते आहे. तिने गडद हिरव्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच, केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडीओमध्ये ती आपल्या अदा आणि स्टाईल दाखवतेय. व्हिडीओ पोस्ट करताना तिने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही.

‘या’ वादामुळे तनुश्री चर्चेत

‘आशिक बनाया…’नंतर गायब झालेली तनुश्री दत्ता 2019मध्ये पुन्हा चर्चेत आली होती. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर #MeeTooचे आरोप केले होते. त्यानंतर ती बर्‍यापैकी चर्चेत आली. तनुश्री बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर राहून बर्‍यापैकी साधे जीवन जगत होती. एवढेच नव्हे तर तिचे वजनही वाढले होते, जे आता पूर्णपणे कमी झाले आहे.

(Aashiq Banaya Aapne Fame Tanushree Dutta share bold video on social media)

हेही वाचा :

Manoj Bajpayee | अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण, स्वतःला केले क्वॉरंटाईन!

50 Years Of Anand | महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट ‘आनंद’, वाचा याचे खास किस्से…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें