Pune Crime : पुण्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीस मारहाण

Pune Crime : पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली होती. आता पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे.

Pune Crime : पुण्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीस मारहाण
gaja marne
| Updated on: Feb 21, 2025 | 10:03 AM

पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद दिसून आला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण. थेट केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याने खळबळ. मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती. स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या व्यक्तीची व्हिडिओ कॉलवर केली विचारपूस.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्यास मारणे टोळीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती. स्वत: केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ कॉल करुन जखमीची चौकशी केली. सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.

नुकतीच एका पोलिसाला मारहाण

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसाचा मोबाईल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यात एकाचवेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारी वाढल्याचे हे संकेत आहेत.